चला, ‘चिमणी’ चं घरटं बनवू या!
कन्नमवार विद्यालयात कार्यशाळाचे आयोजन
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : आज २० मार्च, ” जागतिक चिमणी दिन” औचित्य साधून कन्नमवार विद्यालय आर्वी येथे चिमणीचे घरटे बनवण्याचे कार्यशाळा आयोजन यशस्वीरीतीने पार पडला. मानवी वस्तीजवळ राहणाऱ्या चिमण्यांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने घटू लागली आहे, त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. त्या निमित्याने…
कन्नमवार विद्यालयात
शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते,
अगदी लहान असल्यापासून माणसाला ज्या प्राणी पक्षांची ओळख करून दिली जाते, आपल्या अंगणात नाचणारी, घरांचा अवतीभवती उडणारी, अन् चिवचिवाट करणारी चिऊताई आज बेघर झाली आहे, चिऊताई ला हक्काचा निवारा देण्याचे ठरविले, या कार्यशाळेत ४०० चा वर विद्यार्थ्यांकडून सुदंर अशाप्रकारे कृतिम घरटे बनविण्यात आले. विद्यार्थां मध्ये या उपक्रमाचा माध्यमातून निरीक्षण क्षमता व माहिती संकलनाची आवड निर्माण झाल्याचे कलाशिक्षक प्रकाश निखारे यांनी सांगितले, आज वेगाने होणारे शहरीकरण हे त्याचे मुख्य कारण असून,या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी २०१० पासून दरवर्षी २० मार्च रोजी “वर्ल्ड स्पॅरो डे “अर्थात “जागतिक चिमणी दिन” साजरा केला जातो.गेल्या काही वर्षांत आशियाई देशात चिमण्यांची संख्या घटू लागली असून, भारतात त्याचे प्रमाण अधिक आहे, याबद्दल जागृती साठी दिल्लीने २०१२ मध्ये चिमणीला राज्य पक्षी म्हणून घोषित केले आहे,काही भागात जागृती वाढल्यामुळे त्यांच्या पक्षांसाठी,तसेच खास चीमण्यांसाठीही अन्न- पाण्याची व्यवस्था केली जात आहे, माणसासाठी होत असलेल्या विकास पशुपक्षांचे जीवन भकास करत चालला आहे, जीवनशैलीतील बदलांमुळे जागतिक तापमानवाढीचा फटका बसू लागला आहे. चिमण्यांची संख्या कमी होण्याची तेही एक कारण आहे. सिमेंटची जंगले,मोबाईल टॉवर,विद्युत चुबकिय लहरींमुळे, वाहनांची गर्दी,त्यामुळे होणारे प्रदुषण अशा कारणांमुळे पक्षांची आणि विशेषतः चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे.कारण या चिमण्या मानवी वस्तीतच वास्तव्याला असतात,
चिमण्यांची संख्या घटल्याने ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे, अशी साद घालायची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे,चिमण्यांना वाचविण्याच्या मोहिमेला व्यापक स्वरूप यावं त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले,तर त्यांची घटलेली संख्या नक्की वाढेल असे कन्नमवार विद्यालयातील कलाशिक्षक प्रकाश निखारे त्यांनां वाटते,मानवी वस्तीमध्ये शक्य तिथे वृक्षारोपण,तसेच कृतीम घरटी आणि मातीच्या भांड्यात पाण्याची व्यवस्था,घराचा अंगणात व गच्चीवर दररोज पसाभर धान्य पसरवून टाकणे, अशा उपाययोजना केल्या, तर चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा अनुभवा यला मिळू शकेल,असा विश्वास कन्नमवार विद्यालयातील कलाशिक्षक प्रकाश निखारे यांनी व्यक्त केला.