मुलांनो खुल्या डोळ्यांनी स्वप्न पहा – खासदार डॉ. प्रशांत पडोळे
भंडारा : नुकत्याच झालेल्या भंडारा/गोंदिया लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा व १० वी आणि १२ वी मध्ये उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम भंडारा जिल्हा ख्रिस्ती सेवक संगती व भंडारा जिल्हा काँग्रेस क्रीडा विभाग च्या वतीने स्थानिय भंडारा येथील साई मंगल कार्यालय येथे करण्यात आले.
” मुलांनो झोपेत पाहिलेलं स्वप्न कधीही साकार होत नसतात, त्याकरिता खुल्या डोळ्यांनी स्वप्न पहावे लागेल” असे प्रतिपादन सत्कारमुर्ती नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केले. सदर सत्कार समारंभ मध्ये अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा कांग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई तर प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्हा कांग्रेस महिला अध्यक्षा सौ. जयश्री बोरकर व भंडारा जिल्हा कांग्रेस महासचीव धनंजय तिरपूडे तर पाहूणे म्हणून कमल साठवणे व धारगावेजी उपस्थित होते. या प्रसंगी ५० विद्यार्थ्यांना पाहूण्यांचे हस्ते ट्राॅफी देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे संचालन मास्टर राकेश कोडापे यांनी केले तर प्रास्ताविक रेव्ह. योगेश कोसरे व आभार प्रदर्शन रेव्ह. सुधाकर बावणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रेव्ह. रामकुमार पटेल, पास्टर रोशन मिश्रा, ब्रदर उमेश थाॅमस, संघदिप डोंगरे, पास्टर बबलू देऊरकर, रेव्ह. सत्यदान खंडागळे, पास्टर संजय टेकाम, पास्टर विलास नवले, पास्टर वेंकटेश गुंजेवार, पास्टर धिरज लांजेवार, पास्टर राहुल मेश्राम, पास्टर अशोक शेंडे, पास्टर जगदीश कुंभरे, पास्टर लिलाधर सुखदेवे, पास्टर राजेश सानसरोदे, जितेंद्र मेश्राम व पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.