क्राइम

पती कामावर जाताच ते घरात घुसायचे….

Spread the love
पुणे  / विशेष प्रतिनिधी

                  येथील आंबेगाव परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेसोबत अत्यंत घृणास्पद प्रकार घडला आहे. तिचा पती कामावर गेला की त्या तिघांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जायचा. मागील आठ वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत असलेल्या पीडितेने पोलिसात धाव घेऊन हा प्रकार सांगितला. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आठ महिन्यांपासून सुरू होता छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पती आणि लहान मुलीसह आंबेगाव परिसरात वास्तव्यास आहे. साधारण आठ महिन्यांपूर्वी, जेव्हा पीडितेचा पती कामासाठी घराबाहेर गेला होता, तेव्हा मुख्य आरोपी गुरू दोडमणी याने घरात प्रवेश केला. त्याने पीडितेच्या पती आणि मुलीचा जीव घेण्याची धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला. आपल्या कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण होईल, या भीतीने पीडितेने या घटनेबद्दल कोणालाही सांगितले नाही.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने धैर्याने आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुरू दोडमणी (वय २५), मयूर (वय २६) आणि दीपक काटकर (वय २४) या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे लिपाणे वस्ती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close