आझाद मैदान येथे बैलपोळा साजरा
अरविंद वानखडे / यवतमाळ
यांत्रिकीकरणामुळे शेतीमधलं बैलांच महत्व कमी झालंय. तरीही अनेक शेतक-यांना मशागतीसाठी आजही बैलांवरच अवलंबून राहवं लागतं. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणा-या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा. त्या निमित्त पालकमंत्री यांच्या हस्ते आझाद मैदान येथे उत्कृष्ट बैल जोड्यांना सन्मानित करण्यात आले.
संकट येतील आणि जातील मात्र शेतकऱ्यांनी खचू नये आत्महत्या सारख्या गोष्टीचा विचार शेतकऱ्याने मनात आणू नये सरकारच्या तिजोरीत एक पैसाही शिल्लक राहिला नाही तरी चालेल मात्र शेतकरी जगला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असे वक्तव्य पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
आज शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे पोळा आणि या पोळ्याच्या अनुषंगाने यवतमाळच्या आजाद मैदानावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी बैल जोड्या घेऊन येथे येतात आणि त्यांना या ठिकाणी नगरपरिषदेवर उत्कृष्ठ बैलजोडी घेवून येणाऱ्या शेतकऱ्याला येथे पुरस्कृत केले जाते यावेळेस पालकमंत्री संजय राठोड या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उत्कृष्ट बैलजोडी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. त्याला रोख रक्कम रक्कम आणि शेला आणि नारळ देवून पुरस्कृत करण्यात आले.
यांत्रिकीकरणामुळे बैल जोड्या या पोळ्याच्या सणांनी निमित्ताने आझाद मैदान येथे बैलजोड्या कमी आल्या होत्या त्याचीही खंत पालकमंत्री यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नये असेही त्यांनी सांगितले.
तर अनेकांनी आपल्याला घरीच बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा केला.