बॉयफ्रेंड ला घेऊन दोन तरुणीत राडा : दोघींनी एकमेकांना आपटून आपटून मारले

पूर्वी महिलां किंवा तरुणींमध्ये भांडण सार्वजनिक नळावर , एखाद्या कार्यक्रमात किंवा शाळा – कॉलेज मध्ये पाहायला मिळायचे.पण हल्ली तरुणींमध्ये कुठेही आणि कधीही भांडण होत असल्याचे पाहायला मिळते. पूर्वी अँड्रॉइड मोबाईल नसल्याने अश्या गोष्टी व्हायरल होत नव्हते. पण आता अँड्रॉइड मोबाईल मुळे अशी भांडणे व्हायरल व्हायला लागली आहेत. आणि मुख्य म्हणजे ही भांडणे कोणत्या कारणावरून होतात या बद्दल देखील नेटकऱ्यांना माहिती होत आहे.
कधी प्रियकरावरून तर कधी लोकल ट्रेनमध्ये, मेट्रोमध्ये तरुणींमध्ये कडाक्याचं भांडण होत असतं. छोट्या- छोट्या गोष्टींवरून झालेली भांडणं विकोपाला गेल्योचेही अनेक उदाहरणं देता येतात. अशातच पुन्हा एकदा दोन तरुणींमध्ये भर रस्त्यात भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत सुरूवीस तुम्ही पाहू शकता की,दोन तरुण आणि दोन तरुणी आपआपसात कोणत्यातरी विषयावरुन बोलत आहेत. आकाशी रंगाचं जॅकेट घातलेली तरुणी तिच्यासमोर असलेल्या तरुणाला रागात बोलत आहे. तसेच गुलाबी रंगाचा जॅकेट घातलेली तरुणीही तिच्यामध्ये काही तरी बोलत आहे. बोलत असताना दोघींमध्ये वाद सुरू होतो. पुढे हा वाद विकोपाला जातो आणि दोघींमध्ये हाणामारी सुरू होते.
यानंतर दुसरी तरुणीही तिला मारण्यास सुरूवात करते. या दोघींची हाणामारी ऐवढी टोकाला जाते की, चक्क यात एकीने दुसरीला मारताना गोल फिरवून जमिनीवर आपटलंय. तरीही दोघी थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्याच्यांसोबत असलेले तरुण हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तरी त्यांचं त्या ऐकत नाहीत. अगदी शेवटपर्यंत दोघी एकमेकींना हाणायचं सोडत नाहीत.
सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय. सोशल मीडिया एक्स( ट्वीटर) प्लॅटफॉर्मवरील @gharkekalesh या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की,’एका मुलावरून दोन मुलींमध्ये कलेश’. व्हिडिओ नक्की कोणत्या ठिकाणाचा आहे हे समजू शकले नाही. परंतू तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे.
व्हिडिओ व्हायरल होताना नेटकऱ्यांच्या तूफान प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळत असून मोठ्या प्रमाणात लाईक्स् येत आहेत. कमेंटस् बॉक्समध्ये एका यूजरने लिहिलं आहे की,’हे ठीक आहे…पण हा व्हिडिओ कोण बनवत आहे? तर आणखी एका यूजरने यूजरने लिहिलं आहे की,’हेलिकॉप्टर बनवून फेकून दिले’ अशा प्रकारच्या गमतीदार प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.