तरुणीचा शारीरिक संबंधास नकार ; तरुणीची हत्या

बंगळुरू / विशेष प्रतिनिधी
शेजारी राहणाऱ्या तरुणाला इंजिनिअर असलेल्या ३४ वर्षीय तरुणीशी शारीरिक संबंध ठेवायचे होते.पण तरुणीने त्यास नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मृतक तरुणी
३ जानेवारीला या तरुणीचा मृतदेह घरामध्ये सापडला होता. सुरूवातीला तिचा मृत्यू अपघाती झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला होता. नंतर तिने आत्महत्या केली असावी असे म्हटले जात होते. पण या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली. या ३४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीची हत्या करण्यात आली. घरा शेजारी राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने तिची हत्या केली. शरीरसंबंधाला विरोध केल्यामुळे त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपी
शर्मिला डीके असं या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीचे नाव होते. ती राममू्ती नगरमधील सुब्रमण्या लेआऊट येथील अपार्टमेंटमध्ये एकटीच भाड्याने घर घेऊन राहत होती. ३ जानेवारीला घरामध्ये संशयास्पद अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना एकतर्फी प्रेमातून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. कर्नल कुरई (१८ वर्षे) या तरुणाने तिची हत्या केली. आरोपी तिच्या घराशेजारीच राहतो. तो कॉलेजचा विद्यार्थी आहे.
३ जानेवारीच्या रात्री ९ वाजता आरोपी स्लाइडिंग खिडकीतून शर्मिलाच्या घरामध्ये घुसला. त्याला शर्मिला सोबत शरीरसंबंध ठेवायचे होते. पण शर्मिलाने विरोध करत आरडाओरडा केला. त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. आरोपीने शर्मिलाचे तोंड दाबले आणि ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी घराला आग लावली. त्याने बेडरूममध्ये आग लावली पण आग संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरली.
पोलिसांनी आरोपीविरोधात कलम १०३,६४,६६ आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात असेही समोर आले आहे की, शर्मिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. शेजाऱ्यांच्या मते, शर्मिला अधूनमधून त्याच्याशी बोलत असे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




