क्राइम

भोंदूबाबा खरात चे 58 नाही तर 100 आक्षेपार्ह व्हिडिओ

Spread the love
 
महिलांना गुंगीचे आणि उत्तेजक औषध मिसळलेले पाणी देऊन करत होता अत्याचार 
 

 नाशिक / विशेष प्रतिनिधी 

 
                       भविष्यकार अशोक खरात याचे काळे कारनामे उघड होताच खळबळ माजली आहे. खरात हा उत्तेजक  आणि गुंगीचे औषध मिसळून महिला भक्तांना पाणी देत होता. आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करत होता. 
 अशोक खरात याचे धक्कादायक व्हिडीओ क्लिप समोर आले आहेत. या व्हिडीओ क्लीपमध्ये तो महिलांना गुंगी येणारं पाणी देवून आक्षेपार्ह वर्तवणूक करत असल्याचं निदर्शनास येत आहे. सुरुवातीला या अशोक खरातचे 58 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर आता तब्बल 100 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडल्याचं तपासात समोर आलं आहे. अशोक खरात याचे अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. त्याचे कही नेत्यांसोबतचे फोटोही व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्याची FIR कॉपी समोर आली आहे. या FIR कॉपीमध्ये आरोपी अशोक खरात हा कशाप्रकारे आपले कूकृत्य करायचा हे स्पष्टपणे नमूद केले आहे. अत्यंत संतापजनक असे कृत्य हा अशोक खरात करायचा असं या FIR मधील माहितीतून स्पष्ट होत आहे.

संबंधित FIR मध्ये पीडितेने आपली अशोक खरात याच्यासोबत कशी ओळख झाली? या विषयी सविस्तर माहिती दिली आहे. जुलै 2021 मध्ये आपल्याला लग्नासाठी आलेल्या एका स्थळबद्दल विचारणा करण्यासाठी कुटुंबियांसोबत गेल्याचं पीडितेने सांगितलं. त्यावेळी अशोक खरातने एक खडा दिला. तो खडा गळ्यात घालायला दिला. तो खडा काढला तर लग्न मोडेल असं बाबाने म्हटलं. लग्न जमल्यानंतर आपण कॉलेजला जायला सुरुवात केली तेव्हा तो खडा गळ्यातून काढून ठेवायला लागलो. त्यानंतर अचानक मुलाकडच्यांनी हे लग्न आपल्याला करायचं नसल्याचं म्हणत ते लग्न मोडलं. त्यामुळे आपला अशोक बाबावरचा विश्वास वाढला, असं पीडितेने म्हटलं.
यानंतर आपल्याला अनेकदा वेगवेगळे लग्नासाठी स्थळ आले. अशोक खरातने ती स्थळे चांगली नसल्याचे म्हटलं. यानंतर एक स्थळ योग्य असल्याचं अशोक खरातने म्हटलं. त्यानुसार कुटुंबियांनी लग्न जुळवत साखरपुडा केला. साखरपुड्यानंतर आपल्या होणाऱ्या पतीसह आपण या कथित बाबाच्या आशीर्वादासाठी गेलो. यावेळी या अशोक खरात बाबाने आपल्या कुटुंबियांना कॅबिनच्या बाहेर बसण्यास सांगत पीडितेला ध्यानस्थ करुन प्रार्थना करायचं असल्याचं म्हटलं. सर्वांचा अशोक खरातवर विश्वास असल्याने ते बाहेर गेले. पण त्यानंतर या कथित बाबाने आपल्या कूकृत्याला सुरुवात केली, असं पीडितेने तक्रारीत नमूद केलं आहे.

‘मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा’

या बाबाने सुरुवातीला आपल्याला तांब्याच्या भांड्यात पाणी दिलं. ते पाणी पिण्यास सांगितलं. हे पाणी खारट आणि कडवट लागलं. हे पाणी पिल्यानंतर आपल्याला मळमळल्यासारखं तसेच गरगरल्यासारखं होऊ लागलं. हे पाणी जितकं जास्त होईल तसं शुभ फळ मिळेल, असं बाबाने सांगितलं. तसेच या बाबाने ग्लास डोक्यावर ठेवून उभे राहण्यास सांगितलं आणि गायत्री मंत्र म्हणायला लावले. यानंतर या अशोक खरात बाबाने पीडितेच्या पाठीमागे जावून मंत्र म्हणायला सुरुवात करत पीडितेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

आरोपी अशोक खरात याने पीडितेच्या कानात मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा आहे, असं म्हणत अत्याचार केला. तसेच या प्रकाराबद्दल घरच्यांना किंवा कुणालाही सांगितलं तर तुला आणि तुझ्या पतीला ठार मारेन, अशी धमकी दिली. पीडितेने या धमकीच्या भीतीमुळे कुणाला सांगितलं नाही. यानंतर अशोक खरात हा वारंवार पीडितेला आशीर्वाद घेण्यासाठी येण्याचं सांगून सातत्याने अत्याचार करत राहिला. आरोपी अशोक खरातने पीडितेवर 2023 ते 2025 या काळात अनेकदा अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केल्याचं एफआयआरमध्ये नमूद आहे. आता या प्रकरणात काय-काय घडामोडी समोर येतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close