पांधन रस्तावरील पुल वाहून गेल्याने, शेतकरी दोन वर्षा पासून त्रस्त
शेतक-यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र.
पंचनामा करून रस्ता मोकळा न केल्यास दिला तीव्र आंदोलनाचा इशारा.
*वरूड/तूषार अकर्ते*
मंगळवार दि.४ जुलै ला आमपेड भागातील समस्त शेतकऱ्यांनी व आक्रोश जनशक्ती संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय वरुड, सार्वजनिक बांधकाम विभाग वरुड ,पंचायत समिती सह लोकप्रतिनिधीना निवेदन दिले आहे. या मध्ये नमुद करण्यात आले आहे की नुकताच बांधलेला पुल पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला याची तक्रार शेतक-यांनी वारंवार करून सुद्धा शासन व प्रशासना तर्फे या वर कुठलीही कार्यवाही अद्याप पर्यंत करण्यात आली नाही. त्यामुळे झालेल्या कामाची पाच दिवसाच्या आत चौकशी करावी व तात्काळ संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी व समस्त शेतकऱ्याला जाण्याकरिता पर्यायी व्यवस्था तयार करून देण्यात यावी. तसेच मौजा आमपेंड भागातील आमपेंड व पोरगव्हाण रस्त्यावरुन आत जाणाऱ्या पांदन रस्त्यावर एक नाला व नदी आहे यासाठी वारंवार शेतकऱ्यांनी पुलाची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्या करिता निधी सुद्धा उपलब्ध करण्यात आला पण उपलब्ध करुन दिलेला निधी फक्त ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी आला होता. यामुळे जे काम सन २०२१ मध्ये पुर्ण करण्यात आले तो पुल पाहिल्याच पावसामध्ये पूर्णतः तुटून वाहुन गेला आहे. त्यामुळे वारंवार संपुर्ण शेतक-यांनी महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी, जिल्हाआयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी मोर्शी, पालकमंत्री, आमदार, तहसील कार्यालय या सर्व कार्यालयाकडे व अधिकाऱ्यांकडे या बाबत पाठपुरावा करुन सुध्दा कोणत्याही लोकप्रतिनीधीकडुन व अधिका-याकडुन झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची अजुन पर्यत दखल घेतली नाही. त्यामुळे त्या पुलावरुन जाणेयेणे जिव घेणे झाले आहे. तुटलेल्या पुलामुळे त्या शिवारातील शेतकरी अजुन पर्यंत पेरणी सुध्दा करू शकले नाही. सर्व शेतकरी बांधव आपल्या रोजच्या अडचणीसाठी प्रशासनाला पत्रव्यवहार करीत आहे की आपण या मौजावर येऊन पंचनामा करुन तात्काळ संबधीत ठेकेदार व अधिका-यावर कार्यवाही करावी व शेतकऱ्यांचा जाण्यायेणाचा मार्ग पाच दिवसात मोकळा करुन द्यावा.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशिल बेले, दिलीप वंजारी, मंगलसिंग पवार, अक्षय तागडे, चद्रशेखर बागडे, ताहीर खान, शेतकरी संघटनेचे श्रीराम कोल्हे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते .