शेती विषयक

शेतकऱ्यांच्या हक्काचे प्रलंबित ठिंबक संच, स्प्रिंकलर संचाचे अनुदान केव्हा मिळणार ?

Spread the love

शेतकऱ्याचे ठिंबक संच, स्प्रिंकलर चे प्रलंबित अनुदान त्वरित मिळावे ह्यासाठी विभागीय सहसंचालक यांना निवेदन सादर
 

गेली एक वर्षापासून शेतकरी अनुदानापासून वंचित

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे

जगाचा पोशिंदा म्हणून संबोधला गेलेला शेतकरी हा आजच्या काळात सततच्या निसर्गाचे कोपामुळे आर्थिक दृष्ट्या डबघाईस आलेला आहे, त्याला थोडी फार मदत मिळावी ह्या दृष्टीने शासना कडून त्याला पूर्वी दुकानदारांमार्फत ठिंबक संच, स्प्रिंकलर पाईप हे सरळ सरळ अनुदान वजा करून मिळत होते, ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुकानदारांनी मोनोपल्ली केल्याचे उघड होताच शासनाने डी बि टी पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करून साहित्याचे वाटप केल्या गेले, ह्यामध्ये साहित्याची पूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांना शासनाचे खात्यावर जमा होते , त्यानंतर त्या लाभार्थ्यांना त्यामधून मिळणारे अनुदान हे त्याचे खात्यावर जमा होते, सुरवातीला लाभार्थी शेतकऱ्यांना लगेच अनुदान मिळाले सुद्धा, परंतु गेली एक वर्षापासून ज्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन साहित्य खरेदी केले त्यानी अनुदानाची रक्कम येणार ह्या उद्धेशाने कर्ज बाजारी होऊन शासनाचे तिजोरीत रक्कम जमा केली त्या शेतकऱ्याचे अनुदान अद्याप पर्यंत जमा झाले नाही, त्यामुळे शेतकरी वर्गात फार मोठा नाराजीचा सूर उमटत आहे
ह्याबाबत सदरचे अनुदान शेतकऱ्यांचे खात्यावर त्वरित अदा करण्यात यावे ह्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे मनोहर मुरकुटे माजी शहराध्यक्ष संजय नाठे, वृषभ सातपुते, राजेंद्र पाटील ह्यांनी विभागीय कृषी सहसंचालक के सी मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते, जिल्हाधिकारी सौरभ कटियार ह्यांना लेखी निवेदन दिले असून,सदरचे प्रलंबित अनुदान त्वरित मिळावे अशी विनती केली आहे
ह्याबाबत शासन शेतकऱ्यांनबाबत योग्य भूमिका घेणार कि शेतकऱ्यांचे समस्यांला पाठ दाखवणार ह्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close