हॉटेल मध्ये मुक्काम करताहेत तर या गोष्टीपासून राहा सावध
मुंबई / नवप्रहार मीडिया
कोरोना काळात फिरण्यास प्रतिबंध असल्याकारणाने जेव्हा पासून हे प्रतिबंध हटले तेव्हापासून लोकांनी हिलस्टेशन आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी फिरायला जाणे सुरु केले आहे. अश्यावेळी मुक्काम करताना पर्यटक चांगल्या आणि सोयीसुविधा युक्त हॉटेल्स मध्ये राहणे पसंत करतात. पण या ठिकानी मुक्काम करतांना विशेष काळजी बाळगणे फार आवश्यक आहे. कारण या हॉटेल्स मध्ये तुमच्या सोबत देखील असा प्रकार घडू शकतो.
अशावेळी हॉटेलकडून रहायला आलेल्या लोकांना कॉम्प्लिमेंट्री म्हणून पाण्याची बाटली दिली जाते. पण तुम्हाला आज आम्ही याच पाण्याच्या बाटली संबंधीत असा एक प्रसंग सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला 440 वोल्टचा करंट बसेल.
हो, हे प्रकरण तसंच आहे. ज्यामुळे तुम्हीही हॉटेलमध्ये रहायला गेलात, तर आवर्जून तेथील पाण्याची बाटली तपासा. आता आम्ही असं का म्हणत आहोत, चला जाणून घेऊ.
हॉटेलच्या खोलीत प्रवेश करण्यापूर्वी पाण्याची बाटली ठेवली असेल, तर तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. वास्तविक, नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिलेला छुपा कॅमेरा सापडला आहे.
अनेक हॉटेलमालक त्यांच्या खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे (हॉटेलमध्ये कॅमेऱ्याची गुप्त ठिकाणे) बसवतात आणि जोडप्यांचे खाजगी क्षण टिपल्यानंतर ते विकतात किंवा पैशासाठी जोडप्यांना ब्लॅकमेल करू लागतात.
हॉटेलच्या खोलीत तुमच्या येण्याआधी पारदर्शक बाटली ठेवली असेल, तर घाबरण्याची गरज नाही, पण जर पाण्याची बाटली फॅन्सी कव्हरसह ठेवली असेल, तर तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
वास्तविक, या छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीने जोडप्यांचे खासगी क्षण रेकॉर्ड केले जातात. खरं तर, अनेक लोकप्रिय हॉटेल चेन यामध्ये शोध घेतला असता, हा धक्कादायक खुलासा समोर आला, ज्याबद्दल अनेकांना अजूनही माहिती नाही.
यासारखी फसवणूक टाळण्यासाठी अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आता बाजारात आली आहेत, ज्याद्वारे तुम्ही खोलीत कॅमेरा कुठे बसवला आहे हे सहज शोधू शकता. हे उपकरण पेनसारखे दिसते, जे काही सेकंदात छुपे कॅमेरे शोधते. अनेक प्रकरणांमध्ये, कॅमेरे टीव्ही, अलार्म घड्याळे आणि अगदी बाथरूमच्या नळांमध्ये लपलेले असतात, परंतु या उपकरणांच्या मदतीने तुम्ही फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचवू शकाल.