सामाजिक
दिवाळीच्या दिवसी आंब्याच्या झाडावर पाने तोडत असतांना विजेच्या ताराचा कंरट लागून युवकाचा झाला म्रुत्यु.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
दी.12 ला दुपारी 11 च्या सुमारास घाटंजी तालुक्यातील ससानी गावातील रहिवासी अजण प्रल्हाद राऊत वय 30 हा अंजी शिवारातील भोयर यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर चढूून लक्ष्मी पुजनासाठी आंब्याचे पाने तोडीत असतांना झाडाच्या बाजुने असलेल्या विद्युत ताराला स्पर्श झाल्याने विजेचा शाॅक लागून झाडावरून खाली पडून त्याचा अंत झाला.सणाच्या दिवशी तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने ससाणी गावात शोककळा पसरली व हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेबाबत पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत.
००००००००
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1