बघा कोण म्हणाले रोहित पवारांना की त्याला अजून राजकारणाचे ज्ञान नाही
राजगुरू नगर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
राष्ट्रवादी पक्ष दोन फाड झाल्याने आता दोन्ही गटांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.एकमेकांवर टीका टिपणी करण्याचे दोन्ही गटातील नेते एकही संधी सोडत नासल्याचे पाहायला मिळत आहे.आता अजित दादा बरोबर गेलेले राष्ट्रवादी चे अनुभवी नेते छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्या प्रति भाष्य केले आहे.
रोहित पवार 10 वर्षांचे होते त्यावेळी मी कॉंग्रेसकडून विरोधी पक्ष नेता होतो. शिवसेना-भाजप विरोधात लढत होतो. ते 15 वर्षांचे होते त्यावेळी मी शरद पवार यांच्याबरोबर होतो. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थापना केली.
पक्षाचा प्रांत अध्यक्ष झालो होतो. रोहित पवार याला अजून राजकारणाची माहिती नाही. त्यांना अजून पूर्ण समज आली नाही मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. त्यांना वाडवडिलांचे पाठबळ होते. माझे गॉड फादर कोणीच नव्हते, अशी टीका आमदार रोहित पवार यांच्यावर कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर छगन भुजबळ नाशिक बाजूकडून पुण्याकडे जात असताना राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू-भगतसिंग-सुखदेव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस खेड तालुका व समता परिषद यांच्या वतीने छगन भुजबळ यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष कैलास सांडभोर, विनायक घुमटकर गणेश घुमटकर,सागर सातकर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस व समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सगळेच चोरी मारतात
कोणत्या खात्याचे मंत्री होण्यासाठी इच्छुक आहात असे विचारले असता कोणत्याच खात्याचा मंत्री होण्यास इच्छुक नाही. मला बिनखात्याचा मंत्री व्हायला आवडेल. तसेच अलीकडे राजकारणात एवढ्या मोठ्या घडामोडी झाल्यानंतर सगळेच चोची मारतात, अशी मिश्किल टीका करू कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी राजगुरूनगर येथे उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मात्र यात मी कोठेच नाही
मी फक्त मैदानात भाषणे करणार. माझे काम जनेतला मार्गदर्शन करण्याचे आहे. शरद पवार यांचे भाजप बरोबर 2014 ला सेटलमेंट झाले त्यानंतर 2017 व 2019 ला आणि आताही काही महिन्यांपूर्वी सेटलमेंट झाले; मात्र या सगळ्यात मी कोठेच नाही