बाबासाहेबांना घडविण्यात रमाई चा सिंहाचा वाटा
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते, हे नाकारता येत नाही
ऍड शोभाताई दिलीपराव काळे यांचे प्रतिपादन
आर्वी / प्रतिनिधी
दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ ला सिद्धार्थ बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे रमाई जयंतीच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला संबोधित करताना माननीय एडवोकेट शोभाताई काळे यांनी आपले विचार मांडले तसेचया कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा हैबतपुर येथील मुख्याध्यापिका लक्ष्मीताई दांडेकर,तसेच महाराष्ट्रात प्रथम महिला बस चालक पठाणताई,
चहांदे काकु रुखमाबाई डुकरे
उपस्थित होत्या.
मुख्याध्यापिका लक्ष्मीताई दांडेकर यांनी रमाई आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग आपल्या भाषणातून मांडले.
याप्रसंगी या कार्यक्रमाच्या आयोजक शुभांगीताई पुरोहित ( भिवगडे) यांनी सर्वांना रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप केले तसेच याप्रसंगी छोट्या बाल बालिकांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला तसेच महिलांसाठी सुद्धा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाला पैठणी देऊन सर्व महिलांचा उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या महिला मेळाव्याला सर्व समाजातील स्त्रिया तसेच मुस्लिम समाजातील स्त्रियांचाही सहभाग फार मोठ्या प्रमाणात होता या कार्यक्रमाची सुरवात बुद्ध वंदना प्रज्ञा, शील गुप
तर्फे करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी पुरोहित ( भिवगडे) व सूत्रसंचालन आंकाक्षा नळे तसेच आभारप्रदर्श सोनाली बनसोड यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
प्रिया भिमके,हिना रामटेके,सुप्रिया सुर्यवंशी, आंकाक्षा नळे,उमिला मेंढे, सध्या जिवने सोनाली बन्सोड, मेघा भिमके
यांनी सहकार्य केले.