हिंदू पुरुषाने केले मुस्लिम महिलेशी लग्न ; काही दिवसानंतर आला ठाण्यात रडत
पाटणा / नवप्रहार ब्युरो
बिहारच्या मुझफ्फरपूर मधील औराई गावात एक अजब प्रकरण घडले आहे. येथे एका हिंदू तरुणाने मुस्लिम महिलेशी धर्माच्या सर्व भिंती ओलांडत मंदिरात लग्न केले. लग्नाच्या काही दिवसानंतर तो रडत रडत ठाण्यात पोहचला. पाहूया असे काय घडले या व्यक्ती सोबत .
बिहारच्या मुझफ्फरपूरमधील औरई येथे राहणारा लोकेश शमाच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्यांनी हिंदू रिवाजाप्रमाणे लग्नही केले. लग्नानंतर शमा तिच्या सासरच्या घरी सुखाने राहू लागली. त्यानंतर असं काही घडलं की पती लोकेश रडत पोलिसात पोहोचला.
मुझफ्फरपूरच्या औरई येथील एका गावात राहणारे लोकेश आणि शमा परवीन अनेक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. वेगवेगळ्या धर्मामुळे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हतं. त्यानंतर शमाच्या कुटुंबीयांनी तिला सुरत येथील नातेवाईकाकडे पाठवलं. लोकेश सुरतला पोहोचला आणि त्यानंतर दोघंही तिथून दिल्लीला पळून गेले. दोघांनीही हिंदू रितीरिवाजानुसार मंदिरात लग्न केलं. त्यानंतर तीस हजारी कोर्टात कोर्ट मॅरेज झालं. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी मुझफ्फरपूरच्या गायघाट पोलीस स्टेशन परिसरातून मुलीचं अपहरण केल्याचा आरोप करत गायघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
लग्नानंतर लोकेश आणि शमा त्यांच्या गावी आल्यावर गायघाट आणि औरईच्या पोलिसांनी दोघांनाही सोबत घेतलं. न्यायालयात मुलीचा जबाब नोंदवण्यात आला. कोर्टात मुलीने लोकेशसोबत लग्न करण्याचा विचार स्वीकारला आणि एकत्र राहण्यास सांगितलं. दोघंही प्रौढ होते, त्यामुळे न्यायालयाने त्यांना एकत्र राहण्याचे आदेश दिले. दोघंही गावात एकत्र राहू लागले मात्र आता मुलगी अचानक गायब झाली आहे.
लोकेशने सांगितलं की, एके दिवशी शमाच्या कुटुंबीयांनी डुमरा, सीतामढी इथं त्यांच्या मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. लोकेश पत्नीसह तिथं गेला, मात्र शमाच्या कुटुंबीयांनी तिला जबरदस्तीने आपल्यासोबत नेलं. याबाबत लोकेशने सीतामढीच्या डुमरा पोलिस ठाण्यात अर्ज करून आपली पत्नी परत मिळवून द्यावी यासाठी अर्ज केला. परंतु पोलीस स्टेशन स्तरावर काहीही न झाल्याने लोकेशने सीतामढीचे एसपी, आयजी यांना मेल केला.
या संपूर्ण प्रकरणाबाबत मुजफ्फरपूर पूर्वचे अतिरिक्त एसपी सहरियार अख्तर म्हणाले, ‘हे प्रकरण समोर आलं आहे. मुलगी कोठून बेपत्ता झाली याचा तपास सुरू आहे. तरुणाचं म्हणणं आहे की, मुलीच्या कुटुंबीयांनी तिला गायब केलं आहे, परंतु सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.