सामाजिक

प्रशासनाकडून कारवाईचे लेखी पत्र देऊन उपोषण मागे..

Spread the love

 

आठव्या दिवशी मनसे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांचे सुटले उपोषण..

44 अंश सेल्सिअस कडाक्याच्या उन्हातही सुरू होते उपोषण…

अमरावती / प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्री नितीन एकनाथ शिंदे हे मागील आठ दिवसांपासून गौरखेडा (कुंभी) या ठिकाणी अनधिकृत तसेच चुकीचे ठराव व चुकीच्या परवानग्यांनी तयार करण्यात आलेल्या पेट्रोल पंप विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे उपोषण सुरू केले होते त्यामध्ये ग्रामपंचायत सचिव, सरपंच ,सदस्य,उपविभागीय अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चौकशी अहवालामध्ये दोषी आढळलेले असून यांच्यावर होत नसलेल्या कारवाई बाबत सदर उपोषण सुरू होते,त्यामध्ये प्रशासन कोणाच्या दडपणाखाली कारवाई करण्यास विलंब करीत आहे हा मोठा प्रश्न उभा ठाकला होता,म्हणूनचं कारवाईच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले ,त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे, राजू उंबरकर ,अनिल शिदोरे ,पप्पूभाऊ पाटील यांनीही उपोषण सोडवण्याकरिता प्रशासनाची सकारात्मक चर्चा घडवून आणली त्यामुळे उपोषणाच्या आठव्या दिवशी उपविभागीय अधिकारी लोणारकर साहेब यांनी फळाचा रस पाजून उपोषण करते मनसे तालुकाध्यक्ष नितीन एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र देऊन उपोषण सोडविले,त्यावेळी उपजिल्हाध्यक्ष राज पाटील जनहित संघटक प्रवीण डांगे शहराध्यक्ष गौरव बांते धीरज तायडे जय शिंदे अभिषेक मरसकोल्हे रितेश कडू उपजिल्हाध्यक्ष सचिन बावणेर विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हर्षल ठाकरे यांनीच शहर संघटक बबलू आठवले राज्य कार्यकारिणी सदस्य सुशील पाचघरे जिल्हा सचिव अक्षय काजे पुरुषोत्तम काळे कामगार सेना चिटणीस विकी थेटे दिलीप गुलरेकर रोहण सपुर अनिलभाऊ कानेरकर उपस्थित होते…

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close