आष्टा नगरीत तीन दिवसीय शंकरपटाचे आयोजन

धामणगाव रेल्वे :-
तालुक्यातील संत भिकुजी नगरी आष्टा येथे तीन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आज या शंकरपटाचे उद्घाटन वर्धा लोकसभेचे खासदार रामदास तडस यासोबतच धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ यांच्या हस्ते करण्यात आले.. श्री भिकुजी महाराज संतनगरी आष्टा येथे शंकर पटाचे आयोजन करण्यात आले भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी भारतीय खेळ खेळले गेले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी केले
श्री संत भिकुजी नगरी आष्टा येथे पहिल्यांदा शंकरपाटाचे आयोजन करण्यात आले.. 23 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत शंकरपट आष्टा नगरी चालणार आहे 22 जानेवारी रोजी एक दाणी बैल जोडी या शंकरपाटात धावल्या.. 23 जानेवारी रोजी दुदानी बैल जोड्या धावणार आहेत यासोबतच महिला धुरकरी देखील बैलगाडी हाकणार आहे.. 24 जानेवारीला बैलगाडा शर्यतीचा फायनल राऊंड होणार आहे यामध्ये विजयी धूरकर्याना बक्षीस वितरण केले जाणार आहे.. 23 जानेवारी रोजी २० एकदांनी बैलगाडी शर्यतीत बैलगाड्या धावल्या.. या शंकरपाटात जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजक जगदीश जाधव यांनी केले आहे..
—————————————
बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी आणली होती.. मागील वर्षी ही बंदी काढण्यात आली.. त्यामुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत आपल्याला अनुभवायला मिळते आहे.. या शंकरपटा सोबतच कुस्तीचे आयोजन देखील व्हायला पाहिजे.. यासाठी आम्ही देखील प्रयत्नात असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केल आहे..
—————————————-
भारतीय संस्कृतीमधील मातीतले खेळ खेडल्या गेलेच पाहिजे.. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे बैलगाडा शर्यतीचा आहे.. आष्टा नगरीत हे पहिल वर्ष आहे.. पुढील काळात देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शंकरपट भरेल.. हळूहळू हा पट विदर्भातील महत्त्वाचा शंकर पट म्हणून ओळखला जाईल.. ग्रामीण भागातील लहान सहान उद्योजकांना यातून आर्थिक पाठबळ मिळतं..
– प्रताप अडसड आमदार