सामाजिक

लायन्स क्लब, आर्वी व माहेश्वरी महिला मंडळ, आर्वी द्वारा श्रावणाेउत्सवचे भव्य आयोजन

Spread the love

 

दुल्हन सजावट स्पर्धा ही ठरली कार्यक्रमाची विशेषता

आर्वी, प्रतिनिधी/पंकज गोडबोले

आर्वी : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे लायन्स क्लब, आर्वी व माहेश्वरी महिला मंडळ, आर्वी द्वारा दोन दिवसीय भव्य श्रावण मेळाव्याचे आयोजन स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालय आर्वी येथे २५व २६-०८-२०२३ ला करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सौ मयुराताई अमर काळे उपस्थितीत होत्या ,त्यांच्या तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते श्रीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाच उद्घाटन करण्यात आले होते.
या मेळाव्यात खानपान, स्वादिष्ट व्यंजन, विविध घरगुती वस्तू , ज्वेलरी, रेडिमेट लेडीज ड्रेस व मटेरियल, इत्यादी नवनवीन वस्तूचे प्रदर्शन व त्या वस्तू विक्रीस उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
तसेच या प्रसंगी विशेष आकर्षण म्हणजे शुक्रवार दि.२६-०८-२०२३ रोजी
आर्वित पहिल्यांदाच दुल्हन शृंगार स्पर्धा घेण्यात आली होती हे विशेष.
या स्पर्धेमध्ये एकूण २५ दुल्हन शृंगार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिकसौ सीमा साळुंके , दृतीय पारितोषिक सौ स्वाती डोळस तसेच तृतीय पारितोषिक सौ प्रजाली गुल्हाने यांनी पटकावले या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. तसेच यावेळी उत्कृष्ट व्यंजन स्टॉल, व इतर स्टॉल धारकांना पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सौ शिल्पाताई चांडक यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ कालिंदीताई राणे यांनी केले. यावेळी लायन्स क्लब आर्वी व माहेश्वरी महिला मंडळ आर्वी यांचे सर्व सदस्य उपस्थित होते व सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले.
या आयोजना मध्ये नागपूर, अमरावती, हिंगणघाट ,वर्धा इत्यादी शहरातून येऊन स्टॉल धारकांनी यात सहभाग घेतला .पूर्ण दोन दिवस आर्वी तील नागरिकांनी प्रचंड गर्दी करून या श्रावणउत्सव आयोजनाला उदंड प्रतिसाद दिला .
स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता अशाप्रकारचे आयोजन आम्ही दरवर्षीच करीत असतो, पुढल्या वर्षी सुद्धा प्रचंड जोमाने आम्ही आयोजन करू असे प्रतिपादन लायन्स क्लबच्या माजी अधक्षा डॉ.सौ कालिंदी राणे यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close