अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी शशिकांत मोकाशे यांची नियुक्ती
चंद्रपूर:- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय संपर्कप्रमुख व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शक सूचनेवरून महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिरानिक यांनी शशिकांत मोकाशे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शशिकांत मोकाशे शासन स्तरावर उद्योजकीय ,उपजीविका मार्गदर्शक असून, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्राबरोबरच गेली अनेक वर्षापासून विविध स्तरावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत नुकतीच चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत उपविभागीय दंडाधिकारी चंद्रपूर , बाल गृह तपासणी समितीवर स्वयंसेवी संस्थेचे(बाल,विकास, क्षेत्र )प्रतिनिधी म्हणून अशासकीय सदस्य पदी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत नियुक्ती केली आहे. विविध बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून शशिकांत मोकाशे यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व विविध सामाजिक सेवाभावी संस्था इतर स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.