सामाजिक

युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार यांच्या अध्यक्षतेखाली पुसद येथे निवड प्रक्रिया संपन्न

Spread the love

 

राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी पुसद

पुसद :- येथील शासकीय विश्रामगृहावर युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्याची निवड सर्व संघटित पत्रकार बांधवांच्या अधिनस्त संपन्न झाली, पत्रकाराच्या न्याय व हक्कासाठी सदैव तत्पर असलेले या पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.गणेशभाऊ कचकलवार साहेब यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये व प्रमुख पाहुणे मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पुसद नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अभयभाऊ गडम व दैनिक वृत्तपत्र देशोन्नतीचे पुसद प्रतिनिधी श्री दीपकभाऊ महाडिक यासह दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी प्रदीपदादा नरवाडे, दैनिक जन्ममाध्य प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे व दै.पब्लिक पोस्ट प्रतिनिधी दिनेश खांडेकर व यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री.विजयजी सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महिला यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून रेश्माताई लोखंडे यांची निवड करण्यात आली, तसेच पुसद तालुका अध्यक्ष म्हणून राजूभाऊ राठोड यांची निवड करण्यात आली व यवतमाळ जिल्हा सचिव म्हणून राजूभाऊ सोनुने यांची निवड करण्यात आली पुसदचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष राजू राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पुसद येथे युवा ग्रामीण पत्रकार संघ यांचा विस्तार करण्यात आला. यामध्ये प्रथम शहराध्यक्ष ऋषिकेश जोगदंडे यांना करण्यात आले तर पुसद तालुका उपाध्यक्ष म्हणून शेख शब्बीर शेख बादशाह यांची नियुक्ती करण्यात आली दुसरे उपाध्यक्ष म्हणून बाबा खान यांना करण्यात आले तसेच ज्ञानेश्वर हरी मेटकर यांना तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी लाभलेले महागाव तालुका उपाध्यक्ष तहा मिर्झा ,महागाव तालुका प्रसिद्धीप्रमुख विकास मोरे ,तसेच उमरखेड तालुका मधून तालुकाध्यक्ष विजय कदम, सर्कल प्रमुख म्हणून पोफाळीचे सुहास खंदारे, तर सर्कल प्रमुखपदी सुकळी जहांगीरचे राजेश खंदारे , तसेच सर्कल प्रमुख पदी ढाणकीचे अशोक गायकवाड, आणि उमरखेडच्या महिला अध्यक्ष अन्नपूर्णा बनसोडे मॅडम तर ,मुळावा सर्कल ग्रामीणचे उपाध्यक्ष गौतम पडघने, व शेंबाळपिंपरी सर्कल प्रमुख मुन्नाभाई सिद्दीकी ,व शेंबाळपिंपरी सर्कल उपप्रमुख मोहम्मद शाकीर यासह उपरोक्त पदाधिकाऱ्यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेशभाऊ कचकलवार यांच्या अध्यक्षेखाली निवड करण्यात आली, या कार्यक्रमाच्या वेळेस सर्व पत्रकार बांधवाची आस्थेने हार गुच्छ व निवड पत्र देऊन स्वागत करण्यात आले, तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजूभाऊ सोनुने यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री.विजयभाऊ सूर्यवंशी यांनी केले, आणि शेवटी कार्यक्रमाची सांगता झाली,

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close