अंजनगाव-दर्यापूर क्रुझर व तीन चाकी ऑटोचा भीषण अपघात;14 जण गंभीर व किरकोळ जखमी

अंजनगाव सुर्जी/ सुनील makode
अंजनगाव दर्यापूर मार्गावर निंभारी फाट्यासमोर आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास क्रुझर व तीन चाकी ऑटो चा भीषण अपघात झाला.या अपघातात एकूण १४ जण गंभीर व किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली.सदर क्रुझर क्र.एम एच २२ यु ३१५४,ही दर्यापूर कडून अंजनगाव येथे लग्नकार्यासाठी येत होती आणि तीन चाकी ऑटो हा निंभारी वरुन कोकर्डा कडे जात होता.क्रूजर गाडी च्या मागे येत असलेल्या तीन चाकी ऑटो क्र.एम एच २७ ए एफ ३०७६ याने क्रुझर वाहनाला ओव्हरटेक करत असताना ऑटोने सदर वाहनाला धडक दिली, धडकेत लग्नाच्या वऱ्हाडाने भरलेले क्रुझर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले,क्रुझर मधील एकूण बारा लोकं हे गंभीर व किरकोळ रित्या जखमी झाले तसेच ऑटो मधील ऑटो चालक व त्याचा सहकारी हे गंभीररित्या जखमी असून सर्व १४ जणांना अंजनगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र काही लोकांना गंभीर स्वरूपाचा मार असल्याने त्यांना अचलपूर व अमरावती येथे रेफर करण्यात आले.क्रुझर वाहनात नयना शिरसाट,आकांक्षा शिरसाट दर्यापूर,गौतम सदांशिव राजुरा,संतोष वानखडे वरखेड, दादाराव वानखडे कावसा,रंजना शिरसाट दर्यापूर,श्रुती भोजने दर्यापूर,पद्मा वानखडे, समीक्षा इंगळे,रिया राक्षसकर,अशोक शिरसाट,कैलास खडे सर्व रा.दर्यापूर हे गंभीररित्या जखमी झाले तर ऑटो चालक प्रकाश परातमोल एकलारा,संजय वानखडे निंभारी हे गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती रहीमापुर पोलीस स्टेशन ला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे पोहोचविले,घटनेचा पुढील तपास चिंचोली पोलीस स्टेशन करीत आहे