राजकिय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दाव्याने राजकारणात पुन्हा खळबळ 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क 

              राज्यात निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. आपण बिरोधकांपेक्षा कसे चांगले हे मतदारांना पटवून देण्याचा प्रत्येका कडून प्रयत्न होतो आहे. मंचावरून किंवा मुलाखती दरम्यान काही खळबळजनक दावे देखील केले जात आहेत. दरम्यान अजित पवार यांनी राजकारण खळबळ माजवून देणारा दावा केला आहे. 

राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकाचवेळी फोडले जाणार होते अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे.

शिवसेनेत बंड करून 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवलं. या घटनेच्या बरोबर एका वर्षानंतर म्हणजेच 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडात एका वर्षांचं अंतर होतं. मात्र शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन झालेला होता. गुवाहाटी व्हाया सुरत असा प्रवास एकनाथ शिंदेंसोबतच अजितदादाही करणार होते…मात्र काही अडचण आली आणि अजितदादांना वर्षभर वाट पाहावी लागली. या सगळ्या गोष्टींचा खुलासा दस्तुरखुद्द अजितदादांनीच केलाय. एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले तेव्हाच आमचीसुद्धा तयारी झाली होती असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय.

2019 ते 2024…महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात जास्त उलथापालथीची 5 वर्ष. अभूतपूर्व राजकीय घटनांनी अनेकांना आश्चर्याचे धक्के बसले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. या दोन्ही महत्त्वाच्या पक्षाची शकलं झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवारांनी वेगळी चूल मांडली. काही आमदारांसोबत जाऊन महायुतीत सहभागी झाले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अपयशाचा सामना करावा लागला. आता विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी कसोटीची आहे.अस्तित्वाच्या लढाईत अजित पवार बाजी मारणार का, हे निवडणुकीचा निकाल ठरवणार आहे.

महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण शिवसेनेच्या बंडानं सुरु झाल्याचं वाटत असलं तर महाविकास आघाडीतील दोन पक्ष फोडण्याची स्क्रिप्ट एकाचवेळी लिहल्याचं अजित पवारांच्या वक्तव्यानं अधोरेखित झालंय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close