शालेय शैक्षणिक वर्षांला उत्साहाने सुरुवात
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर जिल्ह्यातील शाळा आज सुरू झाल्यात. आज शाळेचा पहिला दिवस. शासनाने घोषित केल्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा गणवेशाचा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये जरी नवीन शैक्षणिक धोरण चालू करण्यात आले नसले तरी नवीन शैक्षणिक धोरणाचे अंमलबजावण्याची तयारी आता जोरात सुरू आहे. यादृष्टीने नियोजन व पुर्व तयारीसाठी शिक्षण विभाग तत्पर झाले आहे. विद्यार्थ्यी नव्या उमेदीने, उत्साहाने, आनंदाने शाळेत दाखल झाले. प्राथमिक, पूर्ण प्राथमिक शाळा म्हणजेच इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा यावेळी सकाळी नऊच्या नंतर भरवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिलेले आहेत. गेली अनेक वर्ष शालेय शैक्षणिक साहित्यामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पुस्तके यावर्षी शाळेला पहिला दिवशी देण्याचा मनोदय अनेक शाळेने व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या स्वागताचे फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळेच्या पहिला दिवशी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत घेऊन आल्याचे चित्र दिसत होते. शाळेतील शिक्षक वर्ग पहिल्या दिवशी नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक होते कारण दीर्घ सुट्टी नंतर आपल्या सहकाऱ्यांना भेटणार होते. मुंबई मध्ये शिक्षक मतदार संघाची निवडणुक 26 जुन रोजी होत आहे या संधीचा फायदा घेत सर्वच उमेदवारांनी नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत आपला कार्यभाग साधला.