जागतिक

अमेरिकेने उचलले मोठे पाऊल चीन ची चिंता वाढली

Spread the love

अमेरिका / नवप्रहार डेस्क

                        अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी यांना अटक केल्यावर चीनने या कारवाईला विरोध दर्शविला होता. त्यानंतर अमेरिकेने दक्षिण चिनी समुद्रात केलेल्या कारवाईने चीन ची चिंता वाढली आहे.

 अमेरिकेनं आता थेट त्यांचे अणुऊर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन दक्षिण चीनी समुद्रात उतरवलं आहे. या विमानावरून F-35C स्टेल्थ फाइटर जेट्सनं उड्डाण देखील घेतलं आहे. हे रूटीन पेट्रोलिंग असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे, मात्र ही रूटीन पेट्रोलिंग नसून हा अमेरिकेनं चीनला दिलेला इशारा असल्याचं बोललं जात आहे.

बुधवारी अमेरिकेच्या नौदलाकडून छायाचित्र जारी करण्यात आले आहेत, ज्यामध्ये अणुऊर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन दक्षिण चीनी समुद्रात ऑपरेशन करत असल्याचं दिसून येत आहे. आम्ही दक्षिण चीनी समुद्रात विमानवाहू जहाज तैनात केलं आहे कारण याचा मुख्य उद्देश हा या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे आक्रमण होऊ न देणं तसेच मित्र राष्ट्रांसोबत सैन्यांचा ताळमेळ ठेवणे हा आहे, असं स्पष्टीकरण अमेरिकेच्या सैन्यदलाकडून देण्यात आलं आहे.

दक्षिण चीनी समुद्र का आहे एवढा संवेदनशील?

दक्षिण चीनी समुद्रावरून चीनचे आपल्या शेजारी असलेल्या अनेक देशांसोबत वाद सुरू आहेत. चीनकडून या समुद्राच्या मोठ्या भागावर दावा करण्यात आला आहे. चीनचा या समुद्रावरून फिलिपाईन्ससोबत देखील वाद सुरू आहे, विशेष म्हणजे फिलिपाईन्स हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील प्रमुख भागीदार देश आहे, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेनं उचलेलं हे पाऊल धोकादायक मानलं जात आहे. चीनकडे जगातील सर्वात मोठं नौदल आहे.

दरम्यान चीनकडून अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे, निकोलस मादुरो यांची आणि त्यांच्या पत्नीची सुटका करावी अशी मागणी चीनने केली होती. त्यांनंतर आता अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. मात्र यावर अद्याप चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close