आकोट वनपरीक्षेत्रात फर्निचर दुकानातून अवैध सागवान जप्त

मोहाळा येथे सागवान जप्त,वनविभागाची धडक कारवाई
हिवरखेड / बाळासाहेब नेरकर
अकोला प्रादेशिक वनविभागाने अकोट वनपरिक्षेत्रात मौजे मोहाळा येथील अब्दुल मोबीन अब्दुल रशीद राहणार हबीब नगर मोहाळा यांच्या घरात सागवान माल पकडला.अवैध सागवान फर्निचर माल तयार करणाऱ्या फर्निचर दुकानावर धाड टाकुन मोठ्या प्रमाणात सागवानची लाकडे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.या कारवाई मुळे लाकडांची तस्करी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.अकोला वन विभागाला गोपनीय माहिती मिळाली की अकोट तालुक्यातील मोहाळा येथे हबीब नगर मध्ये एका फर्निचर दुकानात विनापरवाना सागवान लाकडापासून घरगुती फर्निचर बनविण्याचे काम सुरू आहे.या माहितीच्या आधारे अकोला प्रादेशिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरगुती फर्निचर मार्ट या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकानी त्यांना अवैधरित्या सागवान लाकडापासून फर्निचर करताना दिसून आले.या कारवाई मध्ये अकोला वन विभागाने सागवान लाकडाचे कट साईज नग तसेच सागवान फर्निचर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी सागवान रंदा मशीन जप्त केली आहे.या कारवाई मध्ये वन विभागाने अंदाजे 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे अवैध सागवानीची तस्करी करून त्याची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.सदरची कारवाई उपवनसंरक्षक डॉ कुमारस्वामी सहाय्यक वनंरक्षक सचिन खुणे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात,सुनील राऊत,तिरुख,याच्या सह इतर वन अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे.