तानाजी युवा बहुउद्देशीय संघटना ने खानापूर येथील महिलेस दिली तातडीची मदत
मोर्शी / ओंकार काळे
आज, दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी, खानापूर येथील सविता रामचंद्र कावलं (वय 45) यांनी शेतात पोयजन घेतले होते. त्यानंतर त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथे दाखल करण्यात आले, जिथे डॉ. हरणे यांच्या मदतीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉ. हरणे यांनी सांगितले की त्या महिलेला त्वरित उपचाराची गरज होती, मात्र त्यावेळी कोणतेही सहकार्य उपलब्ध नव्हते.तानाजी युवा बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दिलीपराव पंडागरे, महासचिव देवेश भाऊ मोहोड, तसेच वेदांत पाटील आणि देशमुख यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. त्यांनी महिलेसाठी तात्काळ ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे रेफर करण्यास मदत केली.तानाजी युवा बहुउद्देशीय संघटनेच्या या वेगवान प्रतिसादामुळे सविता कावलं यांना तातडीने उपचार मिळाले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले.