आध्यात्मिक

श्री नवरंग चिखलदरा देवीदर्शन महापदयात्रेत भाविक – भक्ताचा समिश्र प्रतिसाद

Spread the love

अचलपूर ( प्रतिनिधी)- गेल्या १५ वर्षांपासून श्री नवरंग नवदुर्गा चिखलदरा देवीदर्शन महापदयात्रा महोत्सव समिती तर्फे आज १८ ऑक्टोबर रोजी परतवाडा शहरातील पेंशनपुरा येथील महावीर चौक ,श्री नवरंग मंदिर येथून महापदयात्रेला प्रारंभ झाले. या महापदयात्रेत भाविक – भक्तांचा समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी ठिकठिकाणी लावण्यात आलेले विविध ४५ स्टॉल चा माध्यमातून भाविक – भक्तांना चहा,पिण्याचे पाणी,फराळ , नासत्याचे वाटप करण्यात आले . यावेळी मेळघाट मतदार संघाचे आमदार राजकुमार पटेल,माजी जिल्हा परिषद सदस्य वासंती ताई मंगरोळे, ज्ञानेश्वर राऊत, मनोज नंदवंशी ,अनिल तायडे,सोमेश खानझोडे , उपेन बछले,मयंक शर्मा आदीं प्रामुख्याने उपस्थितीत होते. यावेळी श्री नवरंग नवदुर्गा चिखलदरा देवीदर्शन महापदयात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील खानझोडे ,उपाध्यक्ष गप्पा मिश्रा ,आकाश श्रीवास्तव ,सचिव अरुण पेठकर,महासचिव ऍड.अभिषेक चव्हाण ,अजय जैन ,जितेंद्र उदापुरकर,राजा जयस्वाल , संघटक सनी यादव ,गुड्डू पांडे ,गौरीशंकर श्रीवास आदीनी अथक परिश्रम घेतले.आणि महापदयात्रा महोत्सव समिती , पदयात्रा महाप्रसाद समिती ,मोबाईल लंगर सेवा समितीने सुद्धा सेवा दिली. विशेष म्हणजे या महापदयात्रेत प्रमुख आकर्षण म्हणून बाळूमामा ची पालखी सह ११ हरिपाठ मंडळाचाने सहभाग घेतला .आज १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ वाजता कावडसह पदयात्रा नवरंग मंदिर, परतवाडा ते धामणगांव गढी,मडकी, मोथा , डामरी मार्ग चिखलदरा देवी मंदिर पर्यंत आयोजित करण्यात आली होती . यावेळी भाविक – भक्तामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला .यावेळीं भाविक – भक्तांनी समिती व प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचना ,नियमाचे पालन करून सहकार्य केले.तसेच परिसर सुंदर स्वच्छ यासाठी सर्वांनी आवश्यक काळजी घेतली . या भव्य महापदयात्रेत भाविक – भक्ताचा सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनासह जय श्री कृष्ण गणेश उत्सव मंडळ , बजरंग दल, अचलपूर- परतवाडा चे सदस्य सुद्धा उपस्थितीत होते .
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा चिखलदरा येथील कवायत मैदान येथे श्री नवरंग चिखलदरा देवी दर्शन महापदयात्रा महोत्सव समिती तर्फे हजारो भाविक – भक्तासाठी महाप्रसाद ची व्यवस्था करण्यात आली होती.आणि जसगायन साठी प्रसिद्ध भजन गायक राजेश खोलापुरे, सुधीर रसे, तुषार खेरडे व मंदिर परिसरात सुध्दा श्री हनुमान सुंदरकांड भजन मंडळ तर्फे आयोजन करण्यात आले होते.यावेळी समितीचे उपाध्यक्ष गप्पा मिश्रा, पप्पू सांगणी,छोटू उदापूरकर,बाल्या उदापूरकर, पिंटू उदापूरकर, राजा जयस्वाल, सनी यादव, मोनी इरश्रीद, मोनू जयस्वाल, विजय गुप्ता, शुभम श्रीवास,प्रफुल कुऱ्हेकर,नरेंद्र ठाकूर,रोहित जैन, ऋषभ जैन,सोनू गुप्ता,एड. मुकेश बुंदेले, कुणाल जयस्वाल, भावेश अंबूलकर, सोनू जयस्वाल, हर्ष जयस्वाल, वल्लभ घोटकर, अथर्व घोटकर, वंश यादव, ऍड. अभिषेक चौव्हान आदि सदस्य अथक परिश्रम घेत आहे.

या महापदयात्रेमध्ये दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने समितीच्या अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली .विशेष म्हणजे पोलीस विभाग व महोत्सव समितीचा समन्वयाचा अभाव अनेक ठिकाणी पाहायला मिळाला.

 

या पद यात्रेचे स्वरूप भव्य – दिव्य असताना काही सदस्यांमध्ये असलेले मतभेद समोर आल्याने याचा फटका सहभागी होणाऱ्या भाविक – भक्तांच्या गर्दीवर झाल्याची चर्चा आहे .गेल्या वर्षी वीस हजार भाविक – भक्त सहभागी झाले असताना यंदा भाविकांचा मिळालेला समिश्र प्रतिसाद चिंतेचा विषय बनला आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close