हटके

वाचा …. एका शाळेतील शिक्षिका सोशल मीडियावर का होतेय ट्रोल

Spread the love

                    आनंदाच्या क्षणात नाचणे (डान्स ) हा नेहमीचा भाग आहे. लग्नात किंवा अन्य आनंदाच्या ठिकाणी अनेक महिला, मुली, तरुण, म्हातारे डान्स करून आपला आनंद व्यक्त करतात. डान्स करणे हे चांगले असले तरी कोणत्या ठिकाणी कोणता नाच करावा हे पाहणे फार आवश्यक असते. आता या शिक्षिकेबद्दल सांगायचे तर हीने शाळेतील मुलांसोबत जो डान्स केला ते पाहून नेटकरी संतापले असून त्यांनी शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी केली आहे.

या महिला शिक्षिकेनं चक्क शाळेच्या वर्गातच विद्यार्थ्यांसोबत भोजपूरी गाण्यावर डान्स केला आहे. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सने संताप व्यक्त करत शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी केली आहे.

शाळेतील वर्गात एक महिला शिक्षिका विद्यार्थ्यासोबत भोजपूरी गाण्यावर डान्स करताना या व्हिडीओत दिसते. ‘तेरी आख्या का यो काजल’ या सपना चौधरीच्या गाण्यावर या तरुण शिक्षिकेने डान्स केला आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत ठुमके लगावताना दिसते. या डान्सचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्सने या व्हिडीओला पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी केली आहे.

कारण शिक्षिकेनं केलेलं वर्तन शाळेतील नियमांचं उल्लंघन करणारं आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अश्लील मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असं एका युजरने म्हटलं आहे. “शिक्षक समाजाचा आरसा आहेत त्यामुळं शिक्षिकेनं अशा प्रकारचं कृत्य करणं चुकीचं असून विद्यार्थ्यांनाही त्यांनी चांगलं शिकवलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या युजरने दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close