सामाजिक

फटाके मुक्त दिवाळी साजरी करा समाजसेवक गजानन हरणे यांचे आवाहन

Spread the love

 

अकोला. / प्रतिनिधी

दिवाळी जवळ आली असल्यामुळे सर्वत्र फटाक्याची दुकाने लागली आहेत. तसेच फटाके घेण्यासाठी मुलांची धावपळ चालू आहे. या दिवाळीत फटाके फोडून प्रदूषण केल्यापेक्षा अनेक लोकांना त्रासदायक कृत्य केल्यापेक्षा ही दिवाळी आपण सर्वांन मिळून ‘फटाके मुक्त दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन समाजसेवक गजानन हरणे यांनी केले आहे.

खऱ्या अर्थाने या दिवाळीचा आनंद आपण व इतरांना घेऊ देऊ, दिवाळी आली म्हणजे फटाके आले हा जो समज निर्माण झाला आहे तो सर्वांमिळून तोडूया. दिवाळीनिमित्त शहरात व गावागावांत फटाके उडवले जातात. फटाक्यांमुळे लहान मुले भाजू शकतात. कित्येक ठिकाणी आगी लागतात. मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, आजार माणसे व लहान मुले यांनाही मोठा प्रमाणात त्रास होत असतो. खिशाला सुद्ध आर्थिक फटका बसत असतो. आज अनेक शहरातील प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. दिवाळीचा आनंद कुटुंबीयांसोबत साजरा करावा.फराळ पाण्याचा आनंद घेऊ या. परंतु, दिवाळी मात्र फटाके मुक्त साजरी करूया. यासाठी आई- वडिलांनी मुलांना तसेच शाळा, कॉलेज, महाविद्यालयात सुद्धा फटाके फोडू नये म्हणून प्रबोधन करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचा हा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व जागरूक नागरिकांनी या गंभीर बाबीकडे होणारा पर्यावरणाचा रास थांबवण्यासाठी ‘फटाके मुक्त परिवार’ व फटाक्यांवर स्वयंघोषित नियंत्रण आणण्याची गरज आहे. त्यासाठी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन गजानन हरणे, समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे अकोला जिल्ह्यातील नागरिकांना, तरुण युवक, युवतींना केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close