शासनाच्या उपाययोजना अपुऱ्या: लाडली बहन योजनेत बदलाची* मागणी – खासदार प्रशांत पडोळे
भंडारा, /हंसराज
आज विशेष कार्यक्रमानंतर भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार विश्राम भवन येथे पत्रकार परिषदेस उपस्थित राहिले. त्यांनी आपल्या पहिल्या अधिकृत दौऱ्यात जिल्ह्याच्या समस्यांवर चर्चा केली आणि विधानसभेच्या अधिवेशनानंतर तात्काळ जिल्ह्याचे निरीक्षण केले.
“चाळीस वर्षांपूर्वी भंडाऱ्याची जी हालत होती त्यापेक्षा आता परिस्थिती खूपच खराब झाली आहे,” असे खासदारांनी नगर परिषद CO, PWD इंजिनियर, आणि नॅशनल हायवे इंजिनियर यांच्यासोबत दौरा करून निदर्शनास आणून दिले. त्यांनी रस्त्यांवर असलेल्या गड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आणून दिले आणि दोन दिवसांत रस्त्यांची तात्काळ मरम्मत करण्याचे निर्देश दिले.
शहरात एक व्यवस्थित गार्डन नसल्याचे निदर्शनास आणून, खासदारांनी तिथे दारूच्या बाटल्यां पडल्या दिसल्याने जंगलासारखे वातावरण दिसल्याचे तरुण युवक तिथे ड्रग्स सारखे उधोग करत असतात. त्यामुळे तिथे लहान मुले, परिवार येण्यास नापासंत करत आहेत . “तिथे सुरक्षारक्षक लावून गार्डनचे पुनर्निर्माण करण्याची विनंती केली,”
फिल्टर प्लांटची पाहणी करताना, खासदारांनी तेथे किडे जंतू आढळल्यास नापसंती व्यक्त केली आणि नाग नदीचे गढूळ पाणी वैनगंगा नदीत मिसळत असल्याने स्वास्थ्याच्या समस्या उद्भवू शकतात असे सांगितले. या सर्व संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
संसदेत राहुल गांधीनी नीट घोटाळ्याचे आणि मणिपूरमध्ये झालेल्या महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यांचा उचल केला होता. “सरकारने त्या वेळी यावर कुठलाही शब्द उच्चारला नाही,” असे खासदारांनी छेडले. लाडली बहन योजनेबाबत त्यांनी सांगितले की, “महिलांना मिळणारी मदत 1500/- रुपये पुरेशी नाहीत, त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी योजनेत बदल करणे आवश्यक आहे.”
नवप्रहार प्रतिनिधी हंसराज भंडारा.