क्राइम

प्राध्यापका कडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ 

Spread the love
नापास करण्याची दिली होती धमकी, डॉ.अनिस अहमद अस प्राध्यापकाच नाव

बीड / क्राईम रिपोर्टर

                   होमिओपॅथी चे शिक्षण घेत असलेल्या आणि द्वितीय वर्षात असलेल्या विद्यार्थिनीचा डॉ. अनिस अहमद याने नापास करून पाच वर्ष एकाच क्लास मध्ये नसवेल अशी धमकी देत लैंगिक छळ केला आहे. पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सबंधित प्राध्यापकाला अटक केली आहे. या घटनेनें वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

तब्बल ११ महिने हा धक्कादायक प्रकार सुरू होता. आता अखेर पीडित विद्यार्थिनीने प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी प्राध्यापकाला अटक केली आहे.

डॉ. अनिस अहमद असं आरोपी प्राध्यापकाचं नाव आहे. त्याने होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास परीक्षेत कमी गुण देऊन नापास करेन आणि पाच वर्षे एकाच वर्गात बसवून ठेवेन, अशी धमकी त्याने पीडितेला दिली होती.उपचाराच्या बहाण्याने गैरवर्तन; ११ महिन्यांत चार वेळा छळ

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित २२ वर्षीय विद्यार्थिनी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तिला पीसीओडीचा (PCOD) त्रास असल्याने ती नियमित तपासणीसाठी महाविद्यालयाच्याच रुग्णालयात जात होती. जानेवारी २०२६ मध्ये पहिल्यांदा तपासणीच्या बहाण्याने महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिस अहमद याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिचा लैंगिक छळ सुरू केला.

यानंतर उपचाराच्या निमित्ताने सातत्याने तपासणीसाठी बोलावून गेल्या ११ महिन्यांत त्याने ३ ते ४ वेळा अशाच प्रकारे गैरवर्तन केलं. विद्यार्थिनीने या कृत्याला विरोध केला असता, “हा प्रकार कोणाला सांगितला तर परीक्षेत कमी गुण देईन, पास होऊ देणार नाही आणि एकाच वर्गात पाच वर्षे बसवेन,” अशी धमकी देत त्याने तिच्यावर दबाव टाकला. नापास होण्याच्या भीतीनं तरुणीने अकरा महिने आरोपीचा त्रास सहन केला.अखेर पोलिसांत धाव; आरोपी डॉक्टर गजाआड

प्राध्यापकाच्या या सततच्या त्रासाला आणि धमकीला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थिनीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. अनिस अहमद याच्याविरोधात विनयभंग आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय व शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close