क्राइम

प्रियकरासोबत जंगलातील निर्जन स्थळी आलेल्या तरुणीवर बलात्कार

Spread the love

नागपूर / क्राईम रिपोर्टर

               नागपूर मधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. जंगलातील निर्जन स्थळी आपल्या प्रियकरासोबत बसलेल्या तरुणीवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तरुणी प्रियकरासोबत बसली असताना संशयिताने प्रियकराला मारहाण करून पळवून लावले. मग तरुणीकडे लैंगिक संबंधाची मागणी केली. तरुणीने नकार दिल्यावर जबरदस्ती बलात्कार केला. याबाबत सोनेगाव पोलिसात तरुणीने तक्रार नोंदवली आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याचे स्केच तयार करून शोध मोहीम चालविली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील निर्जन जंगलात 19 वर्षीय तरुणी प्रियकरासोबत फिरायला आली होती. आरोपीने तिच्या प्रियकराला बेदम मारहाण करुन तिथून पळवून लावले. त्यानंतर एकट्या पडलेल्या तरुणीवर आरोपीने जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. तरुणीने प्रतिका करुनही आरोपीने तिच्यावर बळजबरी केली.

तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तरुणी आपल्या मित्रासोबत बसली असताना त्याठिकाणी एक युवक आला. त्याने युवतीच्या मित्राला मारहाण करत पळवून लावले. त्यानंतर तरुणीला धमकी देत शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र तरुणीने नकार दिला असता तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. इतकंच नव्हे तर घटनेचा व्हिडिओदेखील चित्रित केला आहे.

आरोपीने तरुणीकडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेतला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत घटनास्थळावरुन पळ काढला. सोमवारी 23 नोव्हेंबरला दुपारी ही घटना घडली. मात्र घाबरल्यामुळं तरुणीने 24 नोव्हेंबरला संध्याकाळी तक्रार दिल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणी युवतीच्या कुटुंबीयांनी सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आमराई परिसरातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्याची प्रक्रिय सुरू आहे. मात्र अजून पर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती आला नाही.

या घटनेनंतर अमराई जंगल परिसरातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. निर्जन भाग असल्यामुळं स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. परिसरात बेकायदेशीर आणि अश्लील प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मात्र त्यानंतरही आवश्यक बंदोबस्त आणि सुरक्षा नसल्याने अशा प्रकार घडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close