क्राइम

कपल ला गार्डन मध्ये विशिष्ट समाजाच्या पोरांकडून मारहाण

Spread the love
 उद्यानात फोटो काढत असलेल्या कपल ला विशिष्ट समाजाच्या टवाळखोर पोरांकडून मारहाण
मुंबई / विशेष प्रतिनिधी
         एका विशिष्ट समाजाच्या टवाळखोर पोरांकडून उद्यानात फोटो काढत असलेल्या कपल ला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

कुर्ला परिसरातील फिनिक्स मॉलजवळ असलेल्या एका गार्डनमध्ये ही घटना घडली. तिथे फोटो काढत असलेल्या एका जोडप्याला आठ ते दहा मुलांच्या टोळक्याने आधी घाणेरड्या भाषेत टोमणे मारले आणि जेव्हा जोडप्याने याला विरोध केला, तेव्हा त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलत आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

उद्यानात उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये (Mobile) कैद केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये काही मुले जोडप्यावर काठीसारख्या वस्तूने हल्ला करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर या टोळक्याने जोडप्याचा पाठलाग करुन त्यांना पायऱ्यांवरुन खाली पळवून लावले आणि तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाणही केली. या घटनेनंतर घाबरलेल्या जोडप्याने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

पोलिसांनी या टोळक्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला. यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, दुखापत होईल अशा वस्तूसह जमावात सामील होणे, मुद्दामहून मारहाण करुन इजा पोहोचवणे, शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणे आणि धमकी देणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या मारहाणीच्या घटनेवरुन आता राजकारणही तापू लागले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हल्लेखोरांचा उल्लेख करत हा कट्टरतेचा प्रकार असल्याचा आरोप केला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते इंतखाब फारुकी यांनीही या घटनेचा निषेध केला. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, तपासानंतरच यामागील नेमके सत्य समोर येईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close