क्राइम

मैत्रिणीने पार्टीला बोलावले आणि अल्पवयीन तरुणी सोबत घडला भयंकर प्रकार 

Spread the love

दोन तरुणांनी केला रात्रभर बलात्कार

काशीगाव ( ठाणे ) / क्राईम रिपोर्टर 

              मैत्री च्या नावावर कशी फसवणूक होते आणि आयुष्याची अद्दल घडते याची प्रचिती एका अल्पवयीन मुलीला आली आहे. तिला तिढा मैत्रिणीने पार्टीला बोलविल्याने ती त्याठिकाणी गेली.पण मैत्रीण  या मुलीला एकटे सोडूनआपल्या मित्रासह तेथून निघून गेली. या अल्पवयीन मुलीवर पार्टीला आलेल्या दोन तरुणांनी रात्रभर अत्याचार केला. काशीगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पीडितेच्या मैत्रिणीसह चार जणांचा समावेश आहे.

मैत्रीण शीतलने पार्टीसाठी बोलावले आणि…

पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता पीडित तरुणीच्या २५ वर्षीय मैत्रीण शीतल हिने तिला कॉल केला. कॉल करून शीतल पीडित तरुणीला म्हणाली की पार्टीसाठी ये.

पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने पार्टीला बोलावले होते. मात्र, पार्टी सुरू झाल्यानंतर ती तरुणी तिच्या एका मित्रासह निघून गेली आणि नंतर इतर दोन जणांनी तिच्यावर रात्रभर आळीपाळीने बलात्कार केला.

काशीगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पीडितेच्या मैत्रिणीसह चार जणांचा समावेश आहे.

मैत्रीण शीतलने पार्टीसाठी बोलावले आणि…

पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता पीडित तरुणीच्या २५ वर्षीय मैत्रीण शीतल हिने तिला कॉल केला. कॉल करून शीतल पीडित तरुणीला म्हणाली की पार्टीसाठी ये.

पीडित तरुणी शीतलने बोलावलेल्या ठिकाणी गेली. तिथे शीतलने पीडित तरुणीची पीयूष ठाकूर, दुष्यंत सिंह आणि अहत खान या तीन तरुणांसोबत ओळख करुन दिली. त्यानंतर शीतल आणि तीन तरुण तिला घेऊन अहत खान याच्या फ्लॅटवर गेले.

दारू, रात्रभर बलात्कार आणि सोन्याची चेनही चोरली

अहत खान याच्या फ्लॅटवर गेल्यानंतर आरोपी आणि शीतलने मद्यप्राशन केले. त्यांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावले. पीडित तरुणीला नशेत असतानाच शीतल आणि पीयूष हे दोघे फ्लॅटमधून बाहेर निघून गेले. त्यानंतर दोन्ही तरुणांनी पीडित तरुणीवर आळीपाळीने रात्रभर बलात्कार केला.

मध्यरात्रीपासून पहाटे ६ वाजेपर्यंत दोन्ही तरुण तिच्यावर अत्याचार करत होते. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडितेच्या गळ्यातील सोन्याचची ५ ग्रॅमची चेन चोरल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.

मुलगी रात्रभर घरी न आल्याने पालक घाबरले

पीडित तरुणी रात्रभर घरीच आली नाही. त्यामुळे तिचे आईवडील घाबरले. त्यांनी तिचा शोध सुरू केला. सकाळी तरुणी घरी आल्यानंतर ही घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी शीतल, पीयूष ठाकूर, दुष्यंत सिंह आणि अहत खान या चौघांविरुद्ध पोक्सो कायद्यातील कलमान्वये आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close