क्राइम
14 तरुणींना फासून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा


मुंबई /विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलिसांना मोठं यश आलं आहे. एका फरार आरोपीला संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात आणण्यात यश आलंय. या आरोपीचं नाव मोहम्मद माजिन आहे. या नराधमाने लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 14 तरुणींचं लैंगिक शोषण केले. एवढंच नाहीतर त्यांचे मानसिक छळ करून त्यांना लाखोंचा गंडादेखील घातला आहे. या धक्कादायक कृत्यानंतर तो परदेशात फरार झाला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून आज (20 नोव्हेंबर 2026) भारतात यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आलं
महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरनुसार, आरोपी हा मुलींना पहिले प्रेम जाळ्यात अडकवायचा. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचा. त्याने असे एक नाही दोन नाही तब्बल 14 तरुणींसोबत हा भयानक खेळला. एवढंच नाहीतर त्याने या महिलांनाकडून 18 लाखांचा गंडा घातला होता. या प्रकरणात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. पण तो भारतातून फरार झाला होता. त्या आरोपीने या तरुणींचे खाजगी क्षणाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरु केल्यानंतर तोपर्यंत तो भारतातून परदेशात गेला होता.
त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीनुसार, सीबीआयच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो (एनसीबी), नवी दिल्लीने, इंटरपोलमार्फत आरोपीविरुद्ध रेड नोटीस जारी केलं होतं. त्यानंतर या कारवाईला अजून वेग आला होता. त्यानंतर इंटरपोलच्या आंतरराष्ट्रीय चॅनेलद्वारे आरोपीचे ठिकाण शोधमोहिम सुरू झाले आहेत. या शोध मोहीमेत युएईच्या अधिकाऱ्यांनी यश आलं आणि त्याला अटक करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन युएईच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला भारतात प्रत्यार्पणाची परवानगी दिल्यामुळे त्याचा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



