खेळ व क्रीडा

श्रीलंकेचा डबल धमाका , इंग्लंड ला हरवून केला मोठा उलटफेर 

Spread the love
रावळपिंडी / क्रीडा प्रतिनिधी

                   रावलपिंडी येथे श्रीलंकेने डबल धमाका केला आहे. त्यांनी एकदिवसीय सामन्याचा इतिहासात दुसरा सगळ्यात मोठा टार्गेट चेस केला आहे.शिवाय वर्ल्ड रँकिंग मध्ये देखील इंग्लंड ला मागे सारले आहे.

 पुढच्या वर्षी 2027 ला वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. पण या वर्ल्डकपचा आतापासूनच फिव्हर चढताना दिसतो आहे. कारण वनडे क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक रंजक सामने पार पडताना दिसतायत.

आता गुरुवारी इंग्लंडसारख्या बलाढ्य टीमने दिलेले 430 धावांचे लक्ष्य श्रीलंका संघाने दोन विकेट राखून पूर्ण केले होते. त्यामुळे इंग्लंडची नाचक्की झाली होती.कारण इतक्या मोठ्या धावा करून देखील इंग्लंडला श्रीलंकेला रोखता आले नव्हते.त्यामुळे श्रीलंकेने एकप्रकारे इंग्लंडचा घमंड मोडला होता. यासोबत आता श्रीलंकेने वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडला तोंड दाखवायला जाग ठेवली नाही आहे.

खरं तर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 429 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर 430 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य पाहता श्रीलंका हा सामना हारेल असे वाटले होते. पण श्रीलंकेच्या बॅटर्सनी अनपेक्षित अशी कामगिरी करून हा सामना जिंकून दाखवला.त्यामुळे पाकिस्तानच्या रावलपिंडीमध्ये धक्कादायक निकाल लागला. या पराभवाने इंग्लंडला मोठा धक्का बसला होता.

विशेष म्हणजे श्रीलंकेने नुसते इंग्लंडला हरवलं नाही तर वनडे रॅकींगमध्ये देखील पछाडलं आहे.त्यामुळे इंग्लंडला डबल झटका बसला आहे. खरं तर आयसीसीच्या वनडे रॅकिंगमध्ये कालच्या सामन्याआधी श्रीलंका सातव्या स्थानी होती. तर इंग्लंड सहाव्या स्थानी होती. पण श्रीलंकेने कालचा सामना जिंकताच सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच इंग्लंडला या पराभवानंतर दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. इंग्लंड थेट सहाव्या स्थानावरून आठव्या स्थानी घेतली आहे.त्यामुळे इंग्लंडचा मोठा धक्का बसला आहे.
कसा रंगला सामना

पाकिस्तानच्या रावलपिंडीमध्ये पार पडलेल्या सामन्यात इंग्लंड दिलेले 429 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने पूर्ण करत हा सामना 2 विकेट राखून जिंकला आहे. श्रीलंकेकडून पथनायकेने केलेल्या 130 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर श्रीलंकेने हा सामना जिंकून दाखवला आहे. श्रीलंकेने हा नुसता सामना जिंकला नाही तर वनडे क्रिकेटमधलं दुसरं सर्वाधिक लक्ष्य चेस करून दाखवलं होतं.त्यामुळे श्रीलंकेचा हा सर्वात मोठा विजय आहे.

खरं इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर 430 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य श्रीलंका पूर्ण करून दाखवेल असा कुणालाचा विश्वास नव्हता पण श्रीलंकेने करून दाखवले आहे. इंग्लंडने दिलेल्या 430 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नव्हती.कारण कामिंडू मेंडीस 18 वर बाद झाला होता.त्याच्या पाठोपाठ कुसल मेंडीस शुन्यावर बाद झाला.त्यामुळे श्रीलंकेचे 24 वर दोन विकेट पडले होते.

त्यानंतर अविष्का फर्नाडो आणि पवन रथनायकेने श्रीलंकेचा डाव सावरला होता.दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 166 धावांची पार्टनरशीप केली होती, त्यानंतर अविष्का फर्नाडो 97 वर बाद झाला होता. त्यानंतर दासुन शनाका आला आणि त्याने पवस सोबत 133 धावांची पार्टनरशीप केली. या दोन पार्टनरशीप या सामन्याच्या टर्निंग पॉईंट ठरल्या. त्यानतंर दासुन शनाका देखील 97 वर बाद झाला.शनाका बाद झाल्यानंतर जनिथ लियानागे मैदानात आला त्यावेली पवन 130 वर बाद झाला होता.त्यामुळे श्रीलंक मॅच हारते काय वाटत होते त्यावेळी जनिथ 61 धावांनी नाबाद खेळी करून श्रीलंकेला कठिण वाटणाारा 430 धावांचे लक्ष्य 2 विकेट राखून जिंकून दिलं.

इंग्लंडच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर हॅरी ब्रुक 202 धावांची शतकीय खेळी केली होती,त्याच्यासोबत जोन रुटच्या 69 आणि विल जॅक्सनच्या 66 धावांच्या बळावर इंग्लंडने 4 विकेट गमावून 429 धावा केल्या होत्या.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close