क्राइम

उफ्….. स्त्री बीज चा व्यापार करणाऱ्या रॅकेट चा पर्दाफाश

Spread the love

बदलापूर / विशेष प्रतिनिधी

                महिलांच्या अज्ञानतेचा गैरफायदा घेत स्त्री बीज काढून त्याची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

या रॅकेट कडून तब्बल ४० हून अधिक गरीब आणि आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांचे शोषण करण्यात आल्याचा संशय आहे. सगळ्यात भयंकर बाब म्हणजे एका महिलेच्या शरीरातून तब्बल ३३ वेळा स्त्री बीज काढण्यात आल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.

 या संपूर्ण प्रकरणाची भीषणता लक्षात घेता, अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी बदलापूर आणि आसपासच्या परिसरात धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे.

कसा सुरू होता हा काळा धंदा?

ठाणे पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात या संपूर्ण रॅकेटचा पहिल्यांदा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात सुलक्षणा गाडेकर नावाच्या स्थानिक महिलेसह तीन महिलांना पोलिसांनी अटक केली होती.

तपासानुसार, हे संपूर्ण नेटवर्क बदलापुरातून चालवले जात होते. सुलक्षणा गाडेकर ही आपल्या घरातूनच हा बेकायदेशीर धंदा चालवायची. तिच्या घरी ओव्ह्युलेशन-स्टिम्युलेटिंग इंजेक्शन्स साठवून ठेवले होते आणि कोणत्याही वैद्यकीय देखरेखीशिवाय महिलांना ते दिले जात होते.

२५ ते ३० हजार रुपयांचे आमिष

हे रॅकेट प्रामुख्याने अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत असलेल्या आणि गरीब महिलांना लक्ष्य करत असे. महिलांना एका वेळी २५,००० ते ३०,००० रुपये देण्याचे आमिष दाखवून या जीवघेण्या चक्रात ओढले जायचे. इंजेक्शन्स दिल्यानंतर महिलांची अनधिकृतपणे सोनोग्राफी केली जायची. त्यानंतर त्यांना आयव्हीएफ आणि हॉस्पिटल्समध्ये नेले जायचे. त्यानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये महिलांच्या शरीरातून अंडी काढून ती विक्रीसाठी वापरत असत.

एकाच महिलेवर ३३ वेळा शस्त्रक्रिया

वारंवार अंडी काढणे हे महिलांच्या जिवासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. मात्र, पैशांच्या हव्यासापोटी या महिलांच्या आरोग्याशी खेळले जात होते. एका महिलेकडून तब्बल ३३ वेळा अंडी काढण्यात आली. योग्य वैद्यकीय देखरेख आणि सुरक्षेचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे या महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

ईडीची कारवाई

ठाणे पोलिसांच्या तपासापाठोपाठ आता या प्रकरणात ईडीची एंट्री झाली आहे. एजंट, मध्यस्थ आणि व्यावसायिक यांच्यातील कनेक्शनचा शोध घेतला जात आहे. बदलापूरमधील अनेक नामांकित रुग्णालये आणि आयव्हीएफ सेंटर्स आता रडारवर आले आहेत. महिलांची भरती करणाऱ्या एजंट्सपासून ते प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत प्रत्येकाची कसून चौकशी सुरू आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close