क्राइम

पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर पिता पुत्राचा हल्ला, अधिकाऱ्याचा मृत्यू

Spread the love

वाशिम /विशेष प्रतिनिधी

 पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे.

चोंढी येथील पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. ताबा घेण्यावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की, पंप मालक आणि त्याच्या मुलाने कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर अधिकार्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Hingoli Crime)

नेमके घडले काय?

इंडियन ऑइल कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके हे चोंढी येथील पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी त्यांच्या पथकासह गेले होते. यावेळी पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यावरून कंपनीच्या पथकाची पंप मालकाशी बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर पंप मालक आणि त्याच्या मुलाने महेश शेळके यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जातंय. धारदार शस्त्राने शेळके यांच्यावर वार करण्यात आले. हा हल्ला पेट्रोल पंपाच्या बाहेर झाल्याची माहिती आहे. गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्याचं नेमकं कारण आणि घटनेमागील इतर बाबींचा तपास केला जात आहे.दरम्यान, या घटनेची केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महेश शेळके यांच्या हत्येचा निषेध केला.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.पेट्रोल पंपाचा ताबा घेण्याच्या वादातून थेट कंपनीच्या अधिकाऱ्याची हत्या झाल्याने या घटनेने हिंगोलीत खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close