क्राइम
प्राध्यापिकेचा ऑनलाइन छळ करून पैसे उकळणाऱ्या आरोपीला अटक


नाशिक /विशेष प्रतिनिधी
महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका माजी विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये ‘रोमिओगिरी’ करत महिला प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा ऑनलाइन छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
खासगी व्हिडिओ आणि चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने प्राध्यापिकेकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. संशयित चेतन राजाराम आढे ऊर्फ राठोड (रा. अंबड, जालना) याला गंगापूर पोलिसांनी अटक केली.
संशयित चेतन हा पीडित महिला प्राध्यापिका कार्यरत असलेल्या महाविद्यालयात पूर्वी शिक्षण घेत होता. काही कालावधीनंतर प्राध्यापिकेची बदली झाल्याने संशयिताने पुन्हा त्यांच्याशी संपर्क वाढवला. विश्वास संपादन करून त्याने प्राध्यापिकेला प्रेमसंबंधात ओढल्याचा आरोप फिर्यादीत आहे.
खासगी व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड
याचदरम्यान संशयिताने प्राध्यापिकेचे खासगी स्वरूपाचे व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड केल्याचाही आरोप आहे. संशयिताने प्राध्यापिकेला महाराष्ट्राबाहेर एका आठवड्याच्या ट्रिपला येण्यासाठी दबाव टाकला. मात्र प्राध्यापिकेने त्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर संशयिताने त्यांना व्हिडिओ कॉल आणि चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने प्राध्यापिकेकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे अखेर पीडित प्राध्यापिकेने गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी संशयित चेतन राठोड याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा याअंतर्गत गुन्हा दाखल केला केला असून, पोलिसांनी चेतनला अटक केली आहे.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



