क्राइम

मालाड च्या कुटुंबाचा अजब कारनामा,४वर्ष मृतदेह ठेवला फ्रीजर मध्ये

Spread the love

 

उफ्फ …..गेल्या चार वर्षांपासून क्लिनिक च्या फ्रीजर मध्ये ठेवलाय मृतदेह 

मुंबई / विशेष प्रतिनिधी 

                     ऐकावे ते नवलच अश्यातून हा प्रकार घडला आहे. मालाड येथील रहिवासी असलेल्या ८० वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांनी एका क्लिनिक च्या फ्रीजर मध्ये गेल्या चार वर्षांपासून जपून ठेवला होता. हा मृतदेह अमेरिकेतील एका क्रायोनिक्स केंद्रात नेऊन अतिथंड तापमानात जतन करून ठेवण्याचा कुटुंबियांचा प्लान होता. पण पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासणी केली असतात हा प्रकार उघड झाला. पोलिस पुढील कारवाईसाठी कायदे तज्ज्ञांची मदत घेत आहेत. 

 या घटनेमुळे मुंबई पोलीस अवाक झाले आहेत. मृतदेह अशा प्रकारे जतन करण्याच्या कायदेशीर बाबी आणि त्याला परवानगी असल्यास त्या कालावधीबाबत पोलीस आता तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.

पोलिसांना कसं समजलं?

कुरार पोलिसांना सोमवारी रात्री एका गुप्त खबऱ्यामार्फत या प्रकाराची कुणकुण लागली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने मालाडमधील एका बंद असलेल्या पॉलीक्लिनिकवर छापा टाकला. हे क्लिनिक गेल्या महिनाभरापासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद होते. पोलिसांनी तपास केला असता, क्लिनिकमधील एका फ्रीजरमध्ये वृद्ध व्यक्तीचा मृतदेह मिळून आला.

काय आहे ‘क्रायोनिक्स’चा प्रकार?

पोलिसांनी मृताच्या वृद्ध पत्नी आणि प्रौढ मुलांकडे चौकशी केली असता, त्यांनी २०२२ मध्येच नैसर्गिक कारणांमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचे कागदपत्रे दाखवून स्पष्ट केले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी इंटरनेटवर मृतदेह दीर्घकाळ जतन करण्याचे मार्ग शोधले.

 

या शोधादरम्यान त्यांना अमेरिकेतील काही संस्थांबद्दल माहिती मिळाली, ज्या ‘क्रायोनिक्स’ सेवा पुरवतात. या तंत्रज्ञानानुसार कायदेशीररीत्या मृत घोषित केलेल्या व्यक्तींचे शरीर अत्यंत कमी तापमानावर (लिक्विड नायट्रोजनमध्ये) गोठवून ठेवले जाते. पेशी आणि उतींचे जतन वैद्यकीय क्षेत्रात मान्य असले, तरी संपूर्ण शरीराचे ‘क्रायोनिक्स’ करणे हे अजूनही वैज्ञानिकदृष्ट्या प्रायोगिक मानले जाते.

पोलिसांकडून कायदेशीर बाबींचा तपास

कुटुंबियांनी अमेरिकेतील अशा एका संस्थेशी मृतदेह तिकडे नेण्याबाबत पत्रव्यवहार सुरू केला होता. तसेच भारतात कायदेशीर प्रक्रियेबदलही काही वकिलांचा सल्ला घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात मृतदेह मालाडच्या क्लिनिकमध्येच ठेवण्यात आला; मात्र याची कोणतीही कल्पना स्थानिक पोलीस किंवा क्लिनिकच्या व्यवस्थापनाला देण्यात आली नव्हती. ज्या मालकाने हे ठिकाण क्लिनिकसाठी भाड्याने दिले होते, त्यालाही या प्रकाराची कोणतीही माहिती नव्हती.

मंगळवारी पोलिसांनी कुटुंबियांचे, क्लिनिक व्यवस्थापनाचे आणि जागेच्या मालकाचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सध्या पोलिसांनी क्लिनिकबाहेर बंदोबस्त तैनात केला असून, मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अशा प्रकारे मृतदेह दीर्घकाळ जतन करण्याच्या कायदेशीर वैधतेबाबत पोलीस कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close