क्राइम

महिलेला मोबाईलवर मेसेज करणे आले अंगलट , हत्या

Spread the love

सांगली / विशेष प्रतिनिधी 

        एका व्यक्तीच्या महिलेला मेसेज केल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट आले. त्याचे अपहरण करून त्याला मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. 

सांगली शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अवघ्या 5 दिवसांत हत्येचा छडा लावला. पोलिसांनी वैभव ऊर्फ तातोबा केंगार, वय 28, रोहन जयसिंग सावंत, वय 23 आणि राहुल राजेंद्र बाबर, वय 25, या तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट रोजी गोविंद उपासे यांचे आंबेगाव बुद्रुक येथून अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपी त्यांना वाहनातून सांगलीतील शामरावनगर परिसरातील एका गोठ्यात घेऊन गेले. तेथे तिघांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणीनंतर उपासे यांना पुन्हा पुण्यात सोडण्यासाठी आरोपी निघाले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी कडेगाव ते कराड मार्गावरील टेंभू योजनेच्या कॅनॉलमध्ये मृतदेह फेकून दिला.

दरम्यान, शामरावनगर परिसरात एका व्यक्तीला आणून मारहाण केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

गोविंद उपासे बेपत्ता असल्याची तक्रार पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दाखल होती. सांगली पोलिसांच्या तपासातून या बेपत्ता प्रकरणाचा हत्येशी संबंध समोर आला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close