क्राइम

माजी सरपंच महिलेची हत्या अनैतिक संबंधातुन

Spread the love

शाहूवाडी / भिवंडी ( विशेष प्रतिनिधि) 

                   शाहुवाडी तालुक्यातील शिरजगाव येथील महिला सरपंचा च्या हत्येचा छडा लागला आहे. या हत्ये मागे अनैतिक सबंध आणि लग्नाचा तगादा मूळ कारण असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे.

अनैतिक संबंध आणि लग्नाच्या सातत्याने लावलेल्या तगाद्यातून शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या महिला सरपंचाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सुरेखा शिवाजी न्यारे (वय ४०, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) असे मृत महिला सरपंचाचे नाव आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुरेखा न्यारे आणि आरोपी प्रकाश पाटील यांच्यात अनैतिक संबंध होते. सुरेखा यांनी प्रकाशकडे लग्नासाठी तगादा लावून त्याला इशारा दिला होता. याच रागातून प्रकाशने २६ जुलै रोजी सकाळी गावातील शेतात सुरेखा यांचा गळा दाबून खून केला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न फसला

हत्येनंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने सुरेखा यांचा मृतदेह स्वतःच्या इको कारच्या डिक्कीत लपवला. त्यानंतर तो मंगळवारी पहाटे भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाकडे पोहोचला.

सकाळी आरोपीने नातेवाईकाला या हत्येबाबत सांगताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्थानिक नारपोली पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून नारपोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी प्रकाश पाटील याच्या मुसक्या आवळल्या.

या धक्कादायक घटनेमुळे शाहूवाडी तालुक्यासह परिसरात तीव्र खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close