राजकिय

 ठाकरे बंधूंची विजयी सभा झाली पण तरुणाईचा वेगळाच सूर

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                     NEET पेपर फुटी प्रकरणात CJP (कॉक्रोच जनता पार्टी ) ने जंतर मंतर वर आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांच्या आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी दिल्ली जाऊन या आंदोलनाला भेट दिली होती. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्या नंतर ठाकरे बंधू कडून मुंबई मध्ये विजयी सभेचे आयोजन केले होते. पण त्यांच्या या सभेत सहभागी झालेल्या तरुणांनी त्यांनाच आरसा दाखवला आहे.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडली. या सभेदरम्यान उपस्थित असलेल्या जेनझी तरुणांशी केला वृत्तवाहिनीने ने संवाद साधला. या संवादात आंदोलन, राजकीय जबाबदारी, पोस्टर्स आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षांवर विविध प्रतिक्रिया समोर आल्या.

भ्रष्टाचार आणि विविध प्रश्नांवर सातत्याने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार

संवादादरम्यान एका तरुणाने नितीन गडकरी यांच्याविरोधातील पोस्टरकडे लक्ष वेधले. एथेनॉल आणि पेट्रोलच्या पर्यायाबाबत सरकारने सामान्य नागरिकांचा विचार करावा, अशी भावना त्याने व्यक्त केली. आंदोलन पुढेही सुरू राहणार का, असा प्रश्न विचारला असता, हे आंदोलन अल्पकालीन नसून दीर्घकालीन लढा असल्याचे त्याने सांगितले. “हे स्प्रिंट नाही, ही मॅरेथॉन आहे,” असे म्हणत भ्रष्टाचार आणि विविध प्रश्नांवर सातत्याने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला.

यावेळी आंदोलनातील पोस्टर्स, बॅनर्स आणि सहभागींच्या सर्जनशीलतेबाबतही चर्चा झाली. याआधीच्या आंदोलनांपेक्षा या आंदोलनात एक महत्त्वाचा बदल दिसल्याचे संबंधित तरुणाने सांगितले. त्याच्या मते, यापूर्वीच्या आंदोलनांवर विविध राजकीय पक्षांचा प्रभाव असल्याचा आरोप होत असे. मात्र यावेळी शिवसेना आणि मनसेने कार्यकर्त्यांना कोणत्याही पक्षाचा झेंडा न आणता केवळ देशाचा तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी स्वतः पक्षीय झेंड्यांऐवजी राष्ट्रीय ध्वजाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला, हा बदल नागरिकांनी निश्चितच कौतुकास्पद मानला पाहिजे, असे त्याने सांगितले.

“ठाकरे बंधूंनी सत्तेत असताना चुकीचे काम केल्यास त्यांनाही प्रश्न विचारणार”

उद्धव आणि राज ठाकरे हे सध्या विरोधी पक्षात असल्याने या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, मात्र भविष्यात सत्तेत आल्यानंतरही ते ही भूमिका कायम ठेवतील का ?  असा प्रश्नही संवादात उपस्थित झाला. त्यावर संबंधित तरुणाने कोणताही पक्ष सत्तेत असला तरी जनतेने त्याच्याकडून उत्तरदायित्वाची मागणी केली पाहिजे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. ठाकरे बंधू भविष्यात सरकारमध्ये आले आणि चुकीच्या घटना घडल्या, तर त्यांच्याविरोधातही याच ताकदीने उभे राहणे ही जनतेची जबाबदारी असल्याचे त्याने सांगितले. कोणता पक्ष सत्तेत आहे यापेक्षा जनतेने सातत्याने उत्तरदायित्वाची मागणी करणे हेच लोकशाहीचे खरे कर्तव्य असल्याचे मत त्याने व्यक्त केले. दरम्यान, सभास्थळी राज ठाकरे यांचे भाषण सुरू झाल्यानंतर त्यांच्या भाषणानंतर पुन्हा सहभागी तरुणांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात येणार असल्याचेही संवादाच्या शेवटी सांगण्यात आले.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close