सामाजिक

पत्नी माहेरून येईना त्यामुळे पतीने तीन लहान मुलांसह घेतला हा निर्णय 

Spread the love

विशेष प्रतिनिधी /सोलापूर 

                      कुटुंबात लहान सहान भांडणे होत असतात.पण ही भांडणे नवरा बायको च्या आपसी सहमतीने किंवा नातेवाईकांच्या मध्यस्थीने मिटविण्यात येतात. कधी कधी नवरा किंवा बायको यापैकी एकाने घेतलेली टोकाची भूमिका यामुळे अनेक संसार उध्वस्त होतात. या प्रकरणात देखील असेच समोर आले आहे. नवरा बायको मध्ये वाद झाल्याने बायको रुसून माहेरी निघून गेली होती. अनेक प्रयत्न करून देखील ती परत न आल्याने नवऱ्याने आपल्या तीन अपत्यांसह विष प्राशन केले. यात नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. पोल

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात ही दुर्दैवी घटना घडली. भीमा अण्णा वाघमारे (वय ३४) असं विष प्राशन केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. भीमा वाघमारे हे एका सिमेंटच्या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. भीमा वाघमारे आणि त्यांच्या पत्नीत गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते.

बायको माहेराहून परत येईना

वाद इतके विकोपाला गेले की, दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. याच वादातून पत्नीने माहेरी निघून गेली होती. भीमा वाघमारे यांनी आणि नातेवाईकांनी पत्नीचे समजूत inकाढण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने सासरी येण्यास नकार दिला. याच निराशातून भीमा वाघमारे यांनी आपल्या जानवी, प्रगती आणि बाबू यांना वळसंग जवळील शेतात घेऊन गेले होते. त्याचवेळी त्या तिघांना विष देण्यात आलं आणि स्वतःही विष घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विष प्राशन केल्यामुळे शेतातच लेकरांजवळ भीमा वाघमारे यांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाली, त्यांनी शेतात धाव घेतली आणि मुलांना तातडीने रुग्णालयात हलवलं. तिन्ही लहान मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close