पश्चिम बंगाल मध्ये कोणाची सत्ता ? काय म्हणतो एक्झिट पोल

मागील सलग तीन टर्म पासून तृणमूल काँग्रेस च्या ममता बॅनर्जी सत्तेत आहेत. येथे विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजपा मागील पाच वर्षापासून येथे पाय रोवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण यश त्यांच्या पासून दूर आहे. यावेळी भाजपा ने पश्चिम बंगाल सर करण्याची तयारी चालविली आहे. जयललिता यांनी पाच वेळा या राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. (2001 – 2006)
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या 2026 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओपिनियन पोल समोर आला असून राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वेक्षण संस्था Matrize-IANS ने केलेल्या या ओपिनियन पोलमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC+) आघाडीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर भाजप आघाडी (BJP+) दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे BJP+ आघाडीला या निवडणुकीत 110 ते 115 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मतांच्या टक्केवारीबाबत बोलायचे झाल्यास भाजप आघाडीला सुमारे 41 ते 43 टक्के मते मिळू शकतात, असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात भाजप मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहू शकतो; मात्र बहुमतापासून तो काहीसा दूर राहू शकतो, असे चित्र दिसते.
याशिवाय इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना मिळून 5 ते 7 जागा मिळू शकतात, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. या गटाला सुमारे 13 ते 15 टक्के मतांची टक्केवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Matrize-IANS च्या या ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आघाडी सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र निवडणुकीदरम्यान होणारे प्रचार, स्थानिक मुद्दे आणि मतदारांचा अंतिम कल यावर प्रत्यक्ष निकाल अवलंबून असेल.




