अपघात

नातेवाईच्या अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

Spread the love
 सासू सह पाच सुनांचा आणि मुलीचा  अपघाती मृत्यू

राजस्थान /विशेष प्रतिनिधी

            काळ आणि वेळ कधी सांगून येत नसते. त्यामुळे आयुष्याचा काहीच भरवसा नाही असे नेहमीच म्हटल्या जाते. अशीच घटना येथील फतेहपुर शेखावटी येथे घडली आहे. नातेवाईच्या अंत्य संस्कारावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. अपघातात सासू, सहा सुना आणि एका मुलीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळावरील विदारक दृश्य पाहून पाहणाऱ्यांचे मन हेलावले आणि डोळ्यांत पाणी आले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार या कुटुंबाच्या नात्यातील एका महिलेचं निधन झालं होतं. तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होऊन हे कुटुंबीय काही वाहनांमधून माघारी परतत होते. त्यात या सर्व महिला एका कारमध्ये बसल्या होत्या. ही कार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर हरसावा गावाजवळ आली असताना कारच्या चालकाने भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही कार आधी एका पीकअपवर आदळली आणि तशीच फरफटत जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकमध्ये घुसली.

या अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. तसेच कारमधून प्रवास करणारी वृद्ध सासू, पाच सुना आणि मुलगी अशा मिळून ७ जणांचा मृत्यू झाला. तर एक तरुणी आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सासू मोहिनी देवी आणि चंदा देवी, तुलसी देवी, बरखा देवी, आशा देवी, संतोष देवी या सुना आणि इंदिरा या मुलगीचा समावेश होता. तर सोनू आणि कारचालक वसीम हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हरसावा गावाजवळ ही कार पोहोचली असतानाच कारचालकाने ओव्हरटेक कऱण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान, भरधाव वेगामुळे कारवरचं त्याचं नियंत्रण सुटलं आणि ही कार पिकअपवर आदळली. त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकमध्ये जाऊन घुसली. अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या लोकांनी आणि तिथून जात असलेल्या वाहन चालकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच गंभीर जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघात एवढा भीषण होता की त्यात यापैकी काही महिलांचा आधीच मृत्यू झाला होता.

दरम्यान, अंत्यसंस्काराहून परतताना कुटुंबीयांनी कारचालकाला वाहन हळू चालवण्याबाबत बजावले होते. मात्र त्याने भरधाव वेगात कार चालवली आणि ही भीषण दुर्घटना घडली, अशी माहितीही समोर येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close