आफेता चा आत्मा इराण सोबत आपला बदला घेतोय ?

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने आता मोठे रूप धारण केले आहे. इस्रायल या हल्ल्यात हल्यात ईरान चे मोठे नुकसान झाले आहे. अर्थात इराण देखील इस्रायल वर हल्ले करतोय पण या युद्धात इस्रायल या तुलनेत ईरान चे मोठे नुकसान होत असल्याचे बोलल्या जात आहे. शिवाय आता या युद्धात इस्रायल कडून अमेरिकेने उडी घेतली आहे. काल त्यांनी इराण च्या आण्विक स्थळावर हल्ले केले आहेत. अशातच आता एक वेगळी चर्चा रंगू लागली आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे ती चर्चा ?
या दोन देशात भयंकर युद्ध सुरू असतानाच एक अशी बातमी समोर आली आहे, ज्या बातमीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही लोकांकडून असा दावा केला जात आहे की, इराणमध्ये 20 वर्षांपूर्वी एका 16 वर्षांच्या तरुणीला फासावर लटकवण्यात आलं होतं. त्या तरुणीने मरताना इराणला शाप दिला होता. आता याच मुलीचा आत्मा इराणचा बदला घेत आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
इराणच्या नेका शहरात 15 ऑगस्ट 2004 ला एक दुर्दैवी घटना घडली होती, या दिवशी इराणमध्ये अतेफा नावाच्या 16 वर्षांच्या तरुणीला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात आली होती, या घटनेमुळे संपूर्ण जगाचं लक्ष इराणकडे वेधलं होतं. आता असं म्हटलं जात आहे की, या तरुणीने मृत्यूपूर्वी इराणला शाप दिला होता, या तरुणीचा आत्मा इराणचा बदला घेत आहे. अतेफासोबत जे घडलं ते फारच वाईट आणि दु:खद आहे.
इराणी अधिकाऱ्यांकडून 16 वर्षांच्या अतेफावर व्याभिचाराला आरोप करण्यात आला होता, इराणमध्ये या अपराधासाठी मृत्यूदंडाची शिक्षा आहे. इराणी मिडिया आणि तेथील सरकारी व्यवस्थेनं या मुलीचं नाव अतेफा सहालेह असल्याचं सांगितलं तसेच या मुलीचं वय 16 वर्ष असताना देखील रेकॉर्डवर 22 वर्ष दाखवण्यात आलं. त्यानंतर या मुलीला सार्वजनिकरित्या फासावर लटकवण्यात आलं. या प्रकरणात तिचं खर वय लपवण्यात आलं.
अतेफाला 15 ऑगस्ट 2004 रोजी पहाटे 6 वाजता फासावर लटकवण्यात आलं, जज हाजी रेजाई यांनी स्वत: तिच्या गळ्यात फास टाकून तिला क्रेनला लटकवलं. यावेळी तिने मृत्यूपूर्वी इराणला शाप दिला होता, हा श्राप आता खरा ठरत असल्याचा दावा केला जात आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)