श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बुद्रुक येथे श्री सद्गुरू यशवंतबाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन.
अकोले : सोमवार दि.१६ जून २०२५ ते सोमवार दि.२३ जून २०२५ पर्यंत प्रतिआयोध्या श्री क्षेत्र राममाळ उंचखडक बु ll,ता.अकोले,जि.अहिल्यानगर येथे सालाबादप्रमाणे श्री सद्गुरू यशवंतबाबा यांचा ७८ वे पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सप्ताह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे देवस्थान ट्रस्टच्यावतीने अहवान करण्यात आले आहे.अकोले शहराला अगदी हाकेच्या अंतरावर व प्रवरा नदी काठी वसलेल्या श्री क्षेत्र राममाळ येथे नुकताच प्रभू श्रीराम मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय उत्सहात पार पडला या सोहळ्यापासून देवस्थानवर दर्शनासाठी तालुक्यातीलच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातून अनेक भविक भक्त येत आहे. अतिशय शांत व नयनरम्य अशा या परिसरात सोमवार दि.१६ जून २०२५ रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजता मार्गदर्शक योगी केशवबाबा चौधरी,ह.भ.प. मनोहरबाबा भोर,ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली घटस्थापना व धर्म ध्वजारोहण करत या सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होणार आहे व या संपूर्ण सप्ताह काळात सायंकाळी ०७:०० ते ०९:०० या वेळेत अनेक नामवंत कीर्तनकारांचे प्रबोधनरुपी कीर्तन होणार आहे व त्यानंतर अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेआहे.सोमवार दि.२३ जून २०२५ रोजी या सप्ताहची सांगता होणार आहे तर या दिवशी सकाळी ०८:०० ते १०:०० या वेळेत दिंडी प्रदक्षिणा व नंतर १०:०० ते १२:०० या वेळेत ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे,कीर्तनानंतर समस्त बेलदार समाज महाराष्ट्र राज्य यांचे वतिने महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तदपूर्वी सालाबादप्रमाणे देण्यात येणारा श्री सद्गुरू यशवंतबाबा वारकरी जीवन गौरव पुरस्कार(मरणोत्तर) वै.ह.भ.प.नामदेव भिकाजी देशमुख महाराज(सुगाव बुll) यांना देण्यात येणार आहे.तरी या सप्ताह सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविकांना येण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथराव सावंतसाहेब,देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष तसेच अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव देशमुखआण्णा,देवस्थान ट्रस्टचे सरचिटणीस योगी केशवबाबा चौधरी,देवस्थानचे महंत विठ्ठलपंत गोंडे महाराज व सर्व विश्वस्त मंडळाने केले आहे.