विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या घ्यायवट च्या पत्नी आणि मैत्रिणीला अटक

नागपूर / विशेष प्रतिनिधी
मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या आणि त्याच्या कडे आलेल्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या विजय प्रभाकर घायवट chya पत्नीला आणि त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली आहे. घायवट हा आधीपासून तुरुंगात आहे. त्या दोघींच्या मदतीनेच घायवट हे कृत्य करत होता, असे म्हटले जात आहे.
मृणाल विजय घायवट (वय 33) आणि पल्लवी किशोर बेलखोडे (वय 27) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पल्लवी ही सुद्धा पूर्वी घायवटची विद्यार्थिनी होती. नंतर ती घायवटच्या समुपदेशन केंद्रात काम करू लागली. सध्या ती वर्धेच्या देवळी येथे पुरवठा निरीक्षक म्हणून काम करते. गेल्या वर्षी एका अल्पवयीन मुलीने घायवटच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला होता. 2014 मध्ये, ती घायवटच्या मानेवाडा परिसरातील मनोविकास माइंड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये समुपदेशनासाठी गेली होती. अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी घायवटने तिला थेरपी घेण्याचा सल्ला दिला. तो थेरपीच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील कृत्ये करायचा.
दरम्यान, घायवटने दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. त्याने या दुष्कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील बनवले आणि ते त्याने आपल्या पेन ड्राइव्ह आणि संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये ठेवले. नंतर, तो ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे शोषण करत होता. त्याच्या जाळ्यात अडकणारी ती काही एकटी नव्हती.
31 मेपर्यंत पोलिस कोठडी
पीडितांच्या चौकशीदरम्यान, घायवट हा त्याची पत्नी मृणाल आणि पल्लवी यांच्या मदतीने हे कृत्य करत असल्याचे उघड झाले. त्या दोघीही केंद्रात येणाऱ्या तरुणींना त्याच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. पोलिस बऱ्याच दिवसांपासून त्या दोघींचा शोध घेत होते. अखेर बुधवारी पोलिसांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. हुडकेश्वरचे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामटेके, साखरकर आणि कॉन्स्टेबल कल्याणी यांनी दोघांनाही अटक केली. पोलिसांनी दोघींनाही गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 31 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अनेक तक्रारी येताहेत पुढे
घायवटकडे आपली मानसिक समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक मुलीसोबत तो असेच कृत्य करायचा. त्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि एकामागून एक इतर तीन मुलींनी घायवटविरुद्ध तक्रार केली.
पीडितांना तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घायवटच्या लॅपटॉप, संगणक आणि पेन , ड्राइव्हमध्ये अनेक मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे सापडली आहेत. परंतु काही पीडित मुलींचे लग्न झाले आहेत आणि काही शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करत आहेत. बदनामीच्या भीतीपोटी पीडित मुली तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे टाळत आहेत. एसीपी नरेंद्र हिवरे यांनी सर्व पीडितांना कोणतीही न भीती न बाळगता पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.