Uncategorized

महिला डॉक्टरची डोक्यावर वार करून हत्या ; पती घरी आल्यानंतर घटना उघडकीस 

Spread the love

लूटपाट करण्याच्या उद्देशाने हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

नागपूर / नवप्रहार ब्युरो 

                            मेडिकल कॉलेज मध्ये फिजिओथेरपी विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून नोकरीवर असलेल्या प्राध्यापिकेचा मृतदेह त्यांच्या घरात आढळला आहे. त्यांचे पती रायपूर वरून आल्यावर या घटनेचा उलगडा झाला आहे. मृत प्राध्यापिकेचा डोक्यावर वजनदार वस्तुने मारल्याच्या जखमा आढळल्याने ही हत्या लुटापाट करण्याच्या उद्देशाने केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत लाडीकर ले आउट परिसरात घडली आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. डॉ.अर्चना अनिल राहुले असे या मयत महिलेचे नाव आहे. त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या.त्यांचे पती अनिल राहुले हे देखील व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि रायपूरमधील एका रुग्णालयात काम करतात. त्यांचा मुलगा पुणे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. डॉ. अर्चना तिच्या घरात एकट्या राहत होत्या. पती डॉ. अनिल जेव्हा जेव्हा सुट्टी मिळायची तेव्हा नागपूरला यायचे. शनिवारी रात्री 9.30 वाजता डॉक्टर अनिल बऱ्याच दिवसांनी घरी आले. दार उघडे होते आणि आतून भयानक वास येत होता.

आत गेल्यावर अर्चना बेडरूममध्ये जमिनीवर रक्ताने माखलेल्या पडल्या होत्या.पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेच्या वेळी त्या घरात एकट्याच होत्या. या काळात घरात कोण आले हे कळू शकले नाही. डॉ.अर्चना यांच्या डोक्यावर गंभीर जखमांच्या खुणा आहे. मृतदेह कुजलेले होते. डोक्यावर जड वस्तूने प्रहार करण्यात आला होता.दरोडाच्या उद्देश्याने घटना घडल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. घरातून काही वस्तू गहाळ झाल्या आहे का याचा तपास पोलीस करत आहे.

पोलीस मयताच्या फोनच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डची तपासणी केली जात आहे. या काळात त्या कोणाशी बोलल्या हे उघडकीस येईल..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close