राज्य/देश

नागपूरच्या वर्तमान स्थितीवर काय म्हणाले पोलिस आयुक्त 

Spread the love

नागपूर / प्रतिनिधी

औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केलेल्या आंदोलनानंतर नागपूरमध्ये दोन गटात भडकलेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती.

सध्या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? हे सांगताना पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, दंगलीनंतर नागपूरमध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदीबाबत आम्ही थोडा अभ्यास केला. त्यानुसार, कपिलवन आणि नंदनगड पोलीस स्टेशन हद्दीतून संचारबंदी पूर्णपणे हटवण्यात आली आहे.

तर लकडगंज, शांतीनगर, इमामवाडा आणि यशोधरानगर या भागात दोन तासांसाठी संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. इथल्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर झोन तीनमधील कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ या तीन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात अद्यापही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. या दंगलप्रकरणी आत्तापर्यंत ८० लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे, याशिवाय ११ अल्पवयीन मुलंही आहेत.

यातील प्रमुख आरोपी इंजिनिअर फहीम खान दोन-तीन ठिकाणी दिसून आल्याचंही यावेळी आहे. तो सातत्यानं आपला ठिकाण बदलतोय, त्यामुळं त्यावर देखील लक्ष ठेवलं जात आहे. त्याचा इतिहासही तपासला जात आहे. त्यानुसार या सर्व गोष्टी आम्हाला विशिष्ट गोष्टीकडं घेऊन जात आहेत. पण त्या दिशेनं आमचा तपास सुरु आहे, असंही यावेळी पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी सांगितलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close